esakal | धुळे: कपाशी पिकावर लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव
sakal

बोलून बातमी शोधा

Cotton Crop

धुळे: कपाशी पिकावर लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


धामणगाव :
सध्या धुळे तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस (Rain) झाला असला तरी सर्व गावातील शेतकऱ्यांच्या कपाशीवर (Cotton) लाल्या सदृश रोगाचे (Diseases like redness)आक्रमण झाले आहे. पाने लाल होत असून ती करपत आहेत. त्यामुळे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांपुढे नविन संकट (Farmers Crisis) निर्माण आले असून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्न करावे लागत आहे.

हेही वाचा: कृषी मंत्री दादा भुसेंनी चाळिसगाव अतिवृष्टी भागाची केली पाहणी

धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कपाशी हे मुख्य असून दर्जेदार कापसामुळे शिरुड निमगुळ बोरकुंड धामणगाव या परिसराला संपूर्ण तालुक्यातील एक वेगळी ओळख मिळाली आहे. उत्कृष्ट कपाशी उत्पादक म्हणून प्रसिध्द असलेल्या या भागातील लांब धाग्याच्या कापसामुळे भावातही नेहमी तेजी राहत असते. या वर्षी मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने कपाशीच्या पेऱ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र नंतर ठराविक कालावधीत पावसाने उघडीप दिल्याने या पिकाची पाहिजे ती वाढ होऊ शकली नाही. त्यातच सुरवातीला मावा व तुडतुडयांनी हल्लाबोल केल्याने शेतकऱ्यांना महागड्या औषधीने घायळ केले.

हेही वाचा: गिरणा नदीतून भडगाव शहरासाठी ३.२९ दलघमी पाणीसाठा आरक्षित

त्याचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच थ्रीप्स व फुलकिड्याचे कपाशी पिकावर आक्रमण झाले. त्यासाठीही वेगवेगळ्या शिफारस केलेल्या औषधीचा फवारा करूनही काही फरक पडला नाही. आता शेतकऱ्यांच्या कपाशी पीकेवर लाल्यासदृश रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यासाठी संबंधित विभागाने या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

loading image
go to top