धुळे तालुक्यात शिक्षकांची ४९ पदे रिक्त 

जगन्नाथ पाटील
Thursday, 8 October 2020

धुळे तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक २२४ व उच्च प्राथमिक शाळा २० आहेत. या शाळांमध्ये अनुक्रमे २२ हजार ९४४ व ९६३ पटसंख्या आहे.

कापडणे (धुळे) : कोरोनाप्रादुर्भावामुळे सर्व शाळा बंद आहेत. शिक्षण विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार ९० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी घरी बसल्या विविध माध्यमातून अभ्यास करीत असल्याचे एका अहवालात नमूद केले आहे. मात्र, धुळे तालुक्यात शिक्षकांची ४९ पदे रिक्त असताना ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. शाळा उघडण्यापूर्वीच रिक्त पदे भरण्याची मागणी पालक व शिक्षण व्यवस्थापन समित्यांनी केली आहे. 
धुळे तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक २२४ व उच्च प्राथमिक शाळा २० आहेत. या शाळांमध्ये अनुक्रमे २२ हजार ९४४ व ९६३ पटसंख्या आहे. 

शिक्षकपदांना २०१६ मध्ये मंजुरी 
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांसाठी शिक्षकपदांना २०१६ च्या विद्यार्थी संख्यांनुसार मंजुरी आहे. गेल्या तीन- चार वर्षांत निवृत्तीनंतरची पदे रिक्त झाली. ती अद्याप भरलेली नाहीत. दिवाळीअगोदर ही पदे भरणे आवश्यक आहे. दिवाळीनंतर शाळा सुरू होतील. प्रत्यक्ष अध्यापनावर याचा परिणाम होणार आहे. यामुळे ही पदे भरण्याची मागणी होऊ लागली आहे. 
दरम्यान, कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्‍या घरी अभ्यास सुरू आहे. मात्र पदे रिक्त असतील, तर विद्यार्थी विविधांगी मार्गदर्शनापासून वंचित राहत असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. 

धुळे पं. स. अंतर्गत रिक्त पदे 
मंजूर पदे- भरलेली पदे- रिक्त पदे 
उपशिक्षक- ९४९- ९३५- १४ 
पदवीधर शिक्षक- ३९-१८-२१ 
पदोन्नती मुख्याध्यापक- ७१- ५७- १४ 
केंद्रप्रमुख- १९- १७- ०२ 
शिक्षण विस्तार अधिकारी- ०९- ०८- ०१ 
एकूण- १०८७- १०३५- ५२ 

ग्रामपंचायत विभागातील रिक्त पदे 
मंजूर पदे- भरलेली पदे- रिक्त पदे 
विस्तार अधिकारी- ०४ - ०३ - ०१ 
ग्राम विकास अधिकारी- ३० - २८ - ०२ 
ग्रामसेवक- ८५ - ८४ - ०१ 
एकूण- ११९ - ११५ - ०४ 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule taluka zilha parishad school teacher vacancy