शिंदखेडा तालुक्यातील तिन्ही कापूस केंद्र बेमुदत बंद !

विजयसिंह गिरासे 
Wednesday, 9 December 2020

कापसाला ५७२५ रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव आहे. खुल्या बाजाराच्या तुलनेत अधिक दर ‘सीसीआय’ने मिळत आहे. सध्या खेडा खरेदीदेखील मंदावली आहे.

चिमठाणे : दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी कापूस महामंडळाचे (सीसीआय) ग्रेडर बधुरीया व बाळदे (ता. शिरपूर) येथील शेतकरी कम व्यापारी यांच्यात वाद झाला. त्यामुळे उद्या (ता. १०) पुढील आदेश होईपर्यंत शिंदखेडा, दोंडाईचा व ब्राम्हणे येथील कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहेत. वाद ग्रेडर व व्यापारी आणि नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे. आजपर्यंत एक लाख किव्वंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. 

आवश्य वाचा- जैताणे येथे बस-ट्रकचा भीषण अपघात; एक ठार, 29 प्रवासी जखमी
 

महाराष्ट्रात प्रथम सीसीआयने शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडा येथील रेल्वे स्टेशन जवळील वर्धमान जिनींग, दोंडाईचा येथील अभिषेक जिनींग व ब्राम्हणे येथील केशरानंद जिनींग या माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या प्रयत्नांनाने ५ नोव्हेंबरला सुरू करण्यात आले. ‘सीसीआय’च्या केंद्राला शेतकरी प्रथम पसती देत आहे. कापसाला ५७२५ रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव आहे. खुल्या बाजाराच्या तुलनेत अधिक दर ‘सीसीआय’ने मिळत आहे. सध्या खेडा खरेदीदेखील मंदावली आहे. मात्र शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी व कृषी बाजार समितीचे काही संचालक कापसांचे व्यापारी असल्याने शेतकऱ्यांच्या कापसाची प्रतवारी ठरविण्यासाठी जिनींग मालक व बाहेरील पंटर ठरवित असल्याने कापूस केंद्रावर दररोज शेतकरी व ग्रेडर यांच्यात वाद होतात. 

 

शेतकऱयांचे वाहने उभी

दोंडाईचा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात १७०- १७५ एवढे, तर शिंदखेडा येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात ८० वाहने उभे आहेत. शेतकरी कम व्यापारी यांच्यात मंगळवारी दोंडाईचा बाजार समितीत वाद झाला. सर्व सामान्य शेतकरयांचे वाहने दोंडाईचा व शिंदखेडा येथे उभे आहेत. कापूस खरेदी केंद्र बेमुदत बंद असल्याने शेतकरयांना वाहन मालकांना एका दिवसाला ५०० रूपये ' खोटी ' द्यावे लागणार आहे. यांचा भुर्दंड शेतकऱ्याला बसणार आहे. 

वाचा-  नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांचा पिच्छा सोडेना; तूर पिकाला लागली उभळी 
 

ऑनलाइनच्‍या नावाने बाजार समितीत फसवणूक 
तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे अहवान दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीने २३ सप्टेंबर ते २३ ऑक्टोबर पर्यंत दोंडाईचा बाजार समीतीच्या मुख्य कार्यलयात २८५० व शिंदखेडा येथील उपबाजार येथे ५००६ असे एकूण ७८५६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. एका शेतकऱ्याला सात बारा व खाते उतारा तलाठीच्या सही शिक्का, आधार कार्ड व बॅक पासबुकांची झेरॉक्स जोडणे आवश्यक असल्याने एका शेतकऱ्याने २०० रूपये खर्च केला होता. मात्र बाजारात समितीच्या आवारात येथील क्रमांकनुसार मोजले जातील असे बाजार समितीने जाहीर केल्याने दोंडाईचा बाजार समीतीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्यांच्‍या तक्रारी आहेत. 

शिंदखेडा, दोंडाईचा व ब्राम्हणे येथील कापूस जिनींग मध्ये कापसाचा स्‍टॉक जास्त झाल्याने व हवामान विभागाने शनिवारी, रविवारी व सोमवारी पाऊस पडणार आसल्याचे अंदाज असल्या कारणास्तव गुरूवारपासून तीन्ही कापूस खरेदी केंद्र पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. 
-अदित्य वामन 
केंद्र प्रभारी, दोंडाईचा- शिंदखेडा, कापूस मंडळ (सीसीआय) 
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule three cotton centers in shindkheda taluka closed indefinitely