दोन वर्षापासून जामफळ प्रकल्पग्रस्तातील शेतकरी मोबादल्या पासून वंचीत !

एल. बी. चौधरी 
Wednesday, 4 November 2020

जामफळ प्रकल्पालगतच्या परिसरातील शेती व अंतर्गत विहीरी शासनाने ताब्यात घेतल्या. पोटच्या लेकराप्रमाणे शेती सांभाळली. आजी आजोबा, आई वडील यांची पूूर्ण हयात शेतात राबण्यात गेली.

सोनगीर ःदोन वर्षांपासून शेतीत पेरणी केली नाही. पोट भरण्यासाठी घरातील वस्तू विकण्याची वेळ आली. तलाठी, मंडळ अधिकारी, जिल्हाधिकारी, शिरपूर प्रांताधिकारी यांच्याकडे चकरा मारून चपला झिजल्या. खर्च वाढल्याने कर्जात आकंठ बुडालो. आमचीच शेती पण आम्हाला विकत पडेल की काय अशी शंका आहे. किमान आगामी दिवाळीतरी अंधारात जाऊ नये म्हणून आमच्या शेतीचा मोबदला त्वरीत मिळावा, अन्यथा आम्हाला आत्मदहनाचा मार्ग स्विकारावा लागेल, अशा व्यथा जामफळ प्रकल्पांतर्गत बुडीत क्षेत्रातील शेतकर्‍यांनी मांडल्या. 

तापी नदीच्या सुलवाडे येथून जलवाहिनीद्वारे जामफळ प्रकल्प भरुन घेणाऱ्या योजनेचे काम गतिमान आहे. त्यात परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती संपादित झाल्या असूून गेल्या दोन वर्षांपासून मोबदला मिळाला नाही. सोमवारी अनेक शेेतकरी जिल्हाधिकारींची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र त्यांची भेट होवू शकली नाही. त्यामुळे शेतकरी हताश होवून पून्हा घरी आले. 

शेती ताब्यात घेतल्या पण मोबदला नाही दिला
जामफळ प्रकल्पालगतच्या परिसरातील शेती व अंतर्गत विहीरी शासनाने ताब्यात घेतल्या. पोटच्या लेकराप्रमाणे शेती सांभाळली. आजी आजोबा, आई वडील यांची पूूर्ण हयात शेतात राबण्यात गेली. शेतीशी एक भावनिक नाते, कुटुंबांच्या आठवणी आहेत. तरीही कायम दुष्काळी असलेल्या या भागात प्रथमच एक मोठा प्रकल्प येत आहेे.  म्हणून शेतकऱ्यांनी फारसा विरोध न करता शेती दिल्या. शेती गेेल्याने सुरुवातीचेे अनेक दिवस आम्ही रडलो. असे भावनाविवश होऊन दिलीप मोरे यांनी सांगितले.

 

भुमिहीन झाले आणि कायमस्वरूपी रोजगार बुडाला

प्रकल्पात शेतजमीन गेल्याने कायमस्वरूपी रोजगार बुडाला आहे. याचा मोबदला कधी ना कधी तरी मिळेलच पण आजच धरणग्रस्त शेतकऱ्यांना खायला काही नाही. नंतर कितीही पैसे मिळाला तरी उपयोग काय? शेतीवर उदरनिर्वाह अवलंबून असल्याने मोबदला मिळाल्यास भुमिहीन झालेल्या या शेतकऱ्यांना नवीन शेती घेेऊन पोट भरता येईल. म्हणून त्वरीत मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी शेतकरी श्याम माळी, समाधान पाटील, आर. के. माळी, संजय माळी, पराग देशमुख, कैलास वाणी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या वैशाली चौधरी यांचेे पती ज्ञानेश्वर चौधरी आदी उपस्थित होते.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule two years, the farmers affected by the project have been deprived of compensation