esakal | पितृपक्षात डाळी अन्‌ कडधान्य खायचे का? काय आहे कारण
sakal

बोलून बातमी शोधा

vegetable

पितृपक्ष म्‍हटला म्‍हणजे मृत व्यक्‍तीला घास आगारी टाकण्याची प्रथा खानदेशात आहे. याकरीता आवश्‍यक विशिष्‍ट भाज्‍यांची मागणी होत असते. पण सध्याची स्‍थिती आणि भाज्‍यांचे दर पाहता या पितृपक्षात डाळी आणि कडधान्यच खावे का? असे चित्र निर्माण झाले आहे.

पितृपक्षात डाळी अन्‌ कडधान्य खायचे का? काय आहे कारण

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : खानदेशात पितृ पक्षाला मोठे महत्व आहे. घरातील मृत व्यक्तीच्या प्रती संवेदना आणि पुण्यस्मरण म्हणून आगारी टाकून पित्तर बसविण्याची प्रथा वर्षोनुवर्षे चालत आली आहे. त्यासाठी पितृ पक्षात विविध भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तीन महिन्यांच्या सातत्यपुर्ण पावसामुळे भाजीपाला सडल्याने आवक मंदावली आहे. पालेभाज्यांसह फळभाज्यांचे दर प्रती किलो पन्नासपेक्षा अधिक कडाडले आहेत. कोथिंबीर अधिक भाव खात आहे.

बंदिस्त पॅकेज भाजीपाला
पितृपक्षातील श्राध्द घालण्यासाठी सर्व प्रकिरच्या भाजीपाल्याची आवक वाढली आहे. बाजारात भाज्या घेण्यासाठी महिलांची गर्दी वाढली आहे. धुळे शहरात तर श्राध्दसाठीची भाजीपाल्याचे पॅकेज पन्नासपासून ते शंभरपर्यंत मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात भाजीपाला निवडून घेण्यासाठी पॅकेजचा बंदिस्त भाजीपाला घेण्याकडे अधिक कल वाढला आहे.

पावसामुळे भाजीपाला सडला
जुलै व ऑगस्टमध्ये भाजीपाल्याची अधिक लागवड होते. जूनमधील लागवड केलेला भाजीपालाही मोठ्या प्रमाणात निघतो. सातत्यपुर्ण पावसामुळे सडला आहे. उबवणही साठ टक्यांनी घटली. बाजारात आवक कमी अन्‌ श्राध्दसाठी मागणी अधिक वाढल्याने दर कडाडले आहेत.

कोथिंबीर प्रती किलो दोनशे..!
कोथिंबीरीचे दर किरकोळ विक्रेत्यांकडे दर प्रती किलो एकशे ऐंशीपासून दोनशे रूपयापर्यंत आहे. चार- पाच काड्यांची जुळी दहा ते वीसला विक्री होत आहे. धुळे बाजारात घाऊक विक्रेत्यांकडे एकशे वीस ते एकशे साठपपर्यंत आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image