esakal | दगड, माती भरा; पैसे उकळा ! 
sakal

बोलून बातमी शोधा

दगड, माती भरा; पैसे उकळा ! 

ठेकेदाराला कचऱ्याचे अपेक्षित वजन पाहिजे. घरोघरी, गल्लोगल्ली फिरून ओला-सुका कचरा गोळा करून हे अपेक्षित वजन अपेक्षित वेळेत मिळत नाही.

दगड, माती भरा; पैसे उकळा ! 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

दगड, माती भरा; पैसे उकळा ! 

धुळे : महापालिकेच्या कचरा संकलनात पुन्हा एकदा घोळ सुरू आहे. ठेकेदाराला कचऱ्याचे अपेक्षित वजन हवे. त्यामुळे घंटागाडीवरील कामगार घरोघरी, गल्लोगल्ली फिरण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ते नावाला काही ठिकाणी फिरतात आणि थेट एखाद्या ठिकाणावरून दगड, माती, विटा, राडारोडा उचलून घंटागाडीत भरत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, नागरिक घंटागाडीच्या प्रतीक्षेत डोळे लावून असतात. याप्रश्‍नी महापालिकेचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी डोळे मिटून बसले आहेत.

कचऱ्याऐवजी दगड, माती भरून पैसे उकळण्याच्या या प्रकारावर कुणाचेच नियंत्रण नाही का, असा सामान्य नागरिकांचा प्रश्‍न आहे. धुळे शहरातील कचरा संकलनाचे १७ कोटी ७९ लाखांचे कंत्राट तीन वर्षांसाठी नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला दिले गेले. ‘वजनावर मोबदला’ या तत्त्वावर हे कंत्राट दिल्याने समस्या सुटेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा पुरती फोल ठरल्याचे दिसते. वजन वाढविण्यासाठी माती, दगड भरण्याचा प्रकार नवीन नाही. नोव्हेंबर २०१९ मध्येही या प्रकाराची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने नगरसेवकांनी मोठी आदळआपट केली होती. त्यानंतरही हा प्रकार थांबला नाही. कोरोनाच्या संकटामुळे चार महिन्यांपासून इतर विषयांकडे फारसे कुणाचे लक्ष नाही. याच संधीचे सोने करून कचरा संकलनाचा पुन्हा एकदा जोरात घोळ सुरू असल्याचे चित्र आहे. 

कामगार वरचढ की... 
ठेकेदाराला कचऱ्याचे अपेक्षित वजन पाहिजे. घरोघरी, गल्लोगल्ली फिरून ओला-सुका कचरा गोळा करून हे अपेक्षित वजन अपेक्षित वेळेत मिळत नाही. त्यामुळे घंटागाडीवरील कामगार एखाद्या ठिकाणी दगड, माती, राडारोडा उचलतात आणि घंटागाडीत टाकून कचरा डेपोवर नेतात. त्यामुळे ठेकेदाराला अपेक्षित किंवा अपेक्षेपेक्षा जास्त वजन मिळते. त्यामुळे ठेकेदाराकडून तक्रारी होत नाहीत. कामगारांचेही फावते, असा सूर आहे. मात्र, चांगल्या वजनासाठी दगड, मातीच आणा, असा मंत्र या कामगारांना कुणी दिला असण्याचीही शक्यता आहे. या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवू शकणारे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे नेमकी चूक कुणाची, हा प्रश्‍नच आहे. मागील काळात कचरा संकलन करून आणलेल्या घंटागाड्यांमध्ये कचऱ्याचे अपेक्षित वजन न मिळाल्याने ठेकेदाराने घंटागाडीवरील कामगारांचा पगार कापल्याची माहिती आहे. पगारकपातीवरून कामगारांनी वजन वाढविण्यासाठी माती, राडारोडा भरण्यास सुरवात केल्याचे सांगितले जाते. 


घंटागाड्यांचेही नुकसान... 
चार-साडेचार कोटी रुपये खर्च करून नव्याने खरेदी केलेल्या ७९ घंटागाड्यांमधून दगड, मातीची वाहतूक करून घंटागाड्यांचे नुकसान होत असल्याचे दिसते. ठेकेदाराचा करार संपल्यानंतर घंटागाड्या भंगार होऊनच महापालिकेकडे येतील, अशी भीती आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top