धुळे जिल्ह्यात मध्यम प्रकल्पांत 12 टक्केच साठा! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

धुळे ः जिल्ह्यात जूनच्या प्रारंभी झालेल्या जोरदार पावसाचा अपवाद वगळता नंतर पावसाने ओढच दिल्याने जिल्ह्यातील विविध पिकांच्या खरिपाच्या पेरण्या धोक्‍यात आल्या आहेत. काही ठिकाणी तर दुबार पेरणीची स्थिती ओढवली आहे. लवकर पाऊस न झाल्यास पेरणी झालेली पिके वाया जाण्याची भीती व्यक्‍त होत आहे. दुसरीकडे पावसाअभावी जिल्ह्यातील विविध 10 मध्यम प्रकल्पांतील जलसाठाही कमी होत असून, तीन मध्यम प्रकल्प व 47 लघु प्रकल्प अद्यापही कोरडेच आहेत. उर्वरित सर्व प्रकल्पांतही एकूण 11.95 टक्केच जलसाठा आहे. यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त होत असून, सर्वांनाच जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 
 
तीन मध्यम प्रकल्प कोरडे 
जिल्ह्यात सुलवाडे, पांझरा, मालनगाव, जामखेली, कनोली, बुराई, करवंद, अनेर, सोनवद, अमरावती या मध्यम प्रकल्पांसह सुमारे 47 लघु प्रकल्प आहेत. यातील कनोली, सोनवद व अमरावती हे तीन प्रकल्प, तर सर्व 47 लघु प्रकल्प पूर्णतः कोरडे आहेत. सर्व प्रकल्पांमध्ये यंदा पावसाअभावी जलसाठ्याची भर पडू शकलेली नाही. सुलवाडे बॅरेजचा 33.63 टक्‍क्‍यांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व मध्यम प्रकल्पांत 20 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी जलसाठा आहे. पावसाला सुरवात होऊन एक महिना उलटला, तरी पुरेसा पाऊस नसल्याने चिंता व्यक्‍त होत आहे. दुसरीकडे पावसाअभावी खरिपातील सर्वच पिकांची स्थिती केविलवाणी होत आहे. जूनमध्ये सुरवातीला झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीसह विविध पिकांची पेरणी उरकली होती. काही ठिकाणी जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणीला प्रारंभ झाला. यात जिल्ह्यात अधून-मधून तुरळक झालेल्या पावसावरच शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. मात्र, काही दिवसांपासून केवळ पावसाचे वातावरण तयार होत असून, जोरदार पाऊस होत नसल्याने सारेच धास्तावले आहेत. 

मध्यम प्रकल्पनिहाय जलसाठा 
प्रकल्प- साठवण क्षमता (दशलक्ष घनमीटर)- आजचा जलसाठा (दशलक्ष घनमीटर)- टक्केवारी 
सुलवाडे- 65.06- 21.88- 33.63 
सारंगखेडा- 91.81-16.71-18.20 
पांझरा- 35.63- 2.83- 7.94 
मालनगाव- 11.33- 1.44- 12.71 
जामखेली- 12.34- 2.14- 17.34 
कनोली- 8.45- 0.00- 0.00 
बुराई- 14.21- 0.98-6.90 
करवंद- 18.26- 1.50-8.21 
अनेर- 49.27- 8.51-17.27 
सोनवद- 14.36-0.00-0.00 
अमरावती- 21.53- 0.00-0.00 
एकूण- 342.25- 55.99- 16.36 
लघु प्रकल्प (47)-126.36- 0.00- 0.00 
एकूण- 468.61- 55.99-11.95 
 
Web Title: marathi news dhule water prakalp 12 parcent