"होम क्‍वारंटाईन'ची "ती' यादी व्हायरल केली कुणी? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

सोशल मिडीयावर व्हायरल होऊन संबंधितांची ओळख सार्वजनिक झाली आहे. त्यामुळे अशा नागरिकांबद्दल समाजात वेगळी भावना निर्माण होण्याची, भीती निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही यादी व्हायरल कशी झाली याचा शोध घेण्याची गरज व्यक्त होते. 

धुळे ः कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने तपासणी व होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या नावांची यादी सोशल मिडियावर आज व्हायरल झाली. त्यामुळे त्या-त्या भागातील नागरिकांमध्ये भीती पसरण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. त्यामुळे नावांची ही यादी कुणी व्हायरल केली हा गंभीर प्रश्‍न आहे. 

कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने देश-परदेशातून तसेच राज्यातील विविध भागातून नागरिक आपल्या मूळ गावी धुळे शहर व जिल्ह्यात आले. अशा नागरिकांची कोरोनाच्या अनुषंगाने तपासणी करून त्यांना "होम क्वारंटाईन' केले आहे. यातील बऱ्याच जणांची चाचणीही निगेटिव्ह आली आहे. तरीही संबंधितांना किमान 14 दिवस घराबाहेर न पडण्याच्या सूचना देत होम क्वारंटाईन केले आहे. 

नागरिकांमध्ये भीती पसरू नये, संबंधित नागरिकांबाबत गैरसमज निर्माण होऊन त्यांना वाईट वागणूक मिळू नये यासाठी अशा नागरिकांची नावेही जगजाहीर झालेली नव्हती. दरम्यान, आज 15 ते 22 मार्चदरम्यान तपासणी केलेले, होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची यादी आज सोशल मिडीयावर व्हायरल होऊन संबंधितांची ओळख सार्वजनिक झाली आहे. त्यामुळे अशा नागरिकांबद्दल समाजात वेगळी भावना निर्माण होण्याची, भीती निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही यादी व्हायरल कशी झाली याचा शोध घेण्याची गरज व्यक्त होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Who made that "home quarantine" list viral?

टॅग्स
टॉपिकस