esakal | नावाप्रमाणे ‘मोठाभाऊ’चे मोठेपण; अपंग पिंकूला आयुष्‍याभरासाठी आधार
sakal

बोलून बातमी शोधा

marriage handicap girl

दुर्दैवाने मुलगी अपंग असल्याचा खुलासा करण्यात आला. पिंपळगाव- दाभाडी येथील किसन पवार यांची कन्या पिंकू हिच्यासोबत विवाह करण्याची तयारी मोठाभाऊ दाखविली.

नावाप्रमाणे ‘मोठाभाऊ’चे मोठेपण; अपंग पिंकूला आयुष्‍याभरासाठी आधार

sakal_logo
By
दगाजी देवरे

म्हसदी (धुळे) : अलीकडे विवाह जमणे अवघड होत चालले आहे. दुसरीकडे विवाह सोहळ्यात आर्थिक खर्च करणे अवघड होत चालले आहे. परंतु, एका युवकांने अपंग असलेल्‍या युवतीशी विवाह करत आदर्श घडवला आहे. अर्थात नावाप्रमाणे 'मोठाभाऊ'ने मोठेपण दाखवत अपंग 'पिंकू'शी बोहल्यावर चढत आदर्श घडवला.

देगाव (ता.साक्री) येथे माजी सरपंच तथा शिक्षक सुधीर अरुण अकलाडे यांच्याकडे मुळ कोटबेल (ता.सटाणा) येथील मोठाभाऊ शंकर माळी हा युवक गेल्या सात वर्षापासून शेतीचे काम पाहत आहे. अलीकडे उपवर मुलांचे विवाह जमणे तसे अवघड होत आहे. तथापी शेतकरी वा शेती करणाऱ्या मुलांना मुली मिळत नाही; हे वास्तव आहे. मोठाभाऊच्या लग्नाची स्वतःच्या कुटुंबासह श्री.अकलाडे यांना चिंता होतीच. पिंपळगाव- दाभाडी येथे उपवर मुलगी असल्याचे माळी कुटुंबास निदर्शनास आणून देण्यात आले. दुर्दैवाने मुलगी अपंग असल्याचा खुलासा करण्यात आला. पिंपळगाव- दाभाडी येथील किसन पवार यांची कन्या पिंकू हिच्यासोबत विवाह करण्याची तयारी मोठाभाऊ दाखविली. शासनाच्या सर्व नियमांचे पालन सामाजिक अंतर ठेवत अवघ्या शंभर वऱ्हाडींच्या उपस्थित विवाह सोहळा पार पडला. ग्रामपंचायत सदस्य पंडीत अहिरे, माजी पोलिस पाटील विठ्ठल अकलाडे, प्रकाश बर्डे, भटु अहिरे, रामदास अहिरे उपस्थित होते. 


मोठाभाऊचे नावाप्रमाणे मोठेपण..
मुलगी अपंग असली म्हणून काय झाले. आज तिला खऱ्या आधाराची गरज असल्याचे लक्षात घेत मोठाभाऊ विवाह वेदीवर चढण्यासाठी स्वखुशीने राजी झाला. अपंग युवती 'पिंकू'शी विवाह करत धडधाकट मोठाभाऊने नावाप्रमाणेच मोठेपण दाखवले.

पंचायत समितीच्या सदस्यांचे दातृत्व
कोरोना महामारीने अनेकांना माणूसकीचे धडे घालून दिले. एका बाजूला शासन यंत्रणा प्रबोधन करत असताना कोरोनाने अनेक मर्यादा घालून दिल्या. विवाह किंवा अन्य समारंभासाठी उसळणारी गर्दी कमी झाली. हजारांची संख्या शेकडोवर आली. किंबहूना गर्दी करूच नका असा शासनाचा दंडक आहे. मोठाभाऊ आणि पिंकूचा विवाह होतोय खरा...पण गरिबीमुळे अन्नदानाचा प्रश्न ऐरणीवर होता. स्वतःच्या शेतात जबाबदारीने कष्ट उचलणाऱ्या मोठाभाऊच्या लग्नाच्या जेवणावळीचा खर्च करण्याची जबाबदारी माजी सरपंच सुधीर अकलाडे व साक्री पंचायत समितीच्या सदस्या रोहिणी अकलाडे यांनी स्विकारत वर माता- पित्याची भुमिका बजावली. ज्याचे कोणीच नाही... त्यांच्यासाठी अकलाडे दांपत्यासारखे देवदुत हमखास धावून येतात.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image