विषय समित्यांवर बाळासाहेबांचेचं वर्चस्व, फरांदे समर्थकांना डावलले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नाशिक : आवश्यकता नसताना केवळ सत्तेची पदे नगरसेवकांना वाटप करायची म्हणून स्थापन करण्यात आलेल्या विषय समित्यांच्या सभापती, उपसभापतींसह सदस्य नियुक्तीवर आमदार बाळासाहेब सानप यांचेच वर्चस्व मिळविले असून आगामी निवडणुकीसाठी आमदार सानप यांनी तयारी करताना पक्षांतर्गत संघर्षाची देखील थिणगी पडली आहे.

पदांचे वाटप करताना पश्‍चिम मतदारसंघातून सिमा हिरे यांच्या समर्थकांना काही प्रमाणात सत्तेचा वाटा मिळाला तर मध्य विधानसभेच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या समर्थकांना सानप यांनी ठेंगा दाखवतं दोघांमधील संघर्ष कायम ठेवला आहे. 

विषय समित्यांच्या सभापती, उपसभापती पदासाठी आज बिनविरोध निवड प्रक्रिया पार पाडताना त्यातून भाजपच्या पक्षांतर्गत राजकारणाचे विविध पैलु दिसून आले. पुढील वर्षी निवडणुका असल्याने समर्थकांना पदांचे वाटप करून पुर्वचे आमदार बाळासाहेब सानप यांनी खुंटा बळकट केला आहे. चार विषय समित्यांमिळून भाजपचे एकुण वीस सदस्य आहेत. त्यात तब्बल नऊ सदस्य आमदार सानप यांचे असून सभापती पदावर देखील त्यांनाचं संधी देण्यात आली आहे.

शहर सुधार समितीच्या सभापती पुनम सोनवणे, उपसभापती अंबादास पगारे, विधी समिती सभापती सुनिता पिंगळे, उपसभापती अनिता सातभाई, सदस्यपदी संगिता गायकवाड, वैद्यकीय व आरोग्य समितीवर रुची कुंभारकर व हेमंत शेट्टी तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदावर सिमा ताजणे, शितल माळोदे यांना संधी दिल्याने आमदार सानप यांनी मतदारसंघ भक्कम करण्याचा प्रयत्न केला

 त्यातून भाजप मध्ये नव्या वादाची थिणगी पडली आहे. मध्य विधानसभा मतदारसंघातील अर्चना थोरात व सुमन भालेराव वगळता या वसंत गिते समर्थकांना संधी देण्यात आल्याने फरांदे समर्थक भाजप नगरसेवकांना ठेंगा दाखविण्यात आला आहे. 
 
सभापती, उपसभापतींचे पदग्रहण 
विरोधकांनी अर्ज दाखल न केल्याने बिनविरोध पार पडलेल्या विषय समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा फक्त औपचारीकता होती. ती आज पुर्ण झाली. महिला व बालकल्याण समिती सभापती पदी कावेरी घुगे तर उपसभापती पदी डॉ. सिमा ताजणे, वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती पदी सतीश कुलकर्णी तर उपसभापती पदी पल्लवी पाटील, विधी समिती सभापती पदी सुनिता पिंगळे तर उपसभापती पदी अनिता सातभाई, शहर सुधारणा समिती सभापती पदी पुनम सोनवणे तर उपसभापती पदी अंबादास पगारे यांची बिनविरोध निवड निवडणुक निर्णय अधिकारी ज्योतीबा पाटील यांनी जाहिर केल्यानंतर पदग्रहण केले. 
 
Web Title: marathi news different committee