# BATTLE FOR DINDORI दिंडोरीत आमदार जे.पी.गावीतांची उमेदवारी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

नाशिकः मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आज आमदार जीवा पांडू गावीत यांनी दिंडोरी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत माजी आमदार नितीन भोसले, कम्युनिस्ट पक्षाचे राजू देसले, सीटूचे सरचिटणीस डॉ.डी.एल.कराड उपस्थित होते. तत्पूर्वी अशोकस्तंभापर्यत माकपच्या कार्यकर्त्यासोंबत मिरवणूकीने आलेल्या गावीत दुपारी समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. निवडणूक आधिकारी निलेश सागर यांच्याकडे त्यांनी अर्ज दाखल केला. आज आमावस्या असल्याने गावीत वगळता इतर कुणीही उमेदवार फिरकले नाहीत. मात्र अखेरच्या क्षणी काही मिनीटे बाकी असतांना ते समर्थकांसह दाखल झाले.

नाशिकः मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आज आमदार जीवा पांडू गावीत यांनी दिंडोरी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत माजी आमदार नितीन भोसले, कम्युनिस्ट पक्षाचे राजू देसले, सीटूचे सरचिटणीस डॉ.डी.एल.कराड उपस्थित होते. तत्पूर्वी अशोकस्तंभापर्यत माकपच्या कार्यकर्त्यासोंबत मिरवणूकीने आलेल्या गावीत दुपारी समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. निवडणूक आधिकारी निलेश सागर यांच्याकडे त्यांनी अर्ज दाखल केला. आज आमावस्या असल्याने गावीत वगळता इतर कुणीही उमेदवार फिरकले नाहीत. मात्र अखेरच्या क्षणी काही मिनीटे बाकी असतांना ते समर्थकांसह दाखल झाले. दिंडोरी व नाशिकमधील माकपचे दोन्ही उमेदवार एकाचवेळी उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी अपेक्षा होती. मात्र आज केवळ श्री गावीत यांनीच अर्ज दाखल केला. 
 

Web Title: marathi news dindori loksabha