साप साप म्हणून भुई बडविणाऱ्यांना बसली चपराक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

सटाणा-  आमच्या जातपडताळणी वैधतेचा मुद्दा याशिवाय विरोधकांकडे सरे राजकीय भांडवलच नाही. माझा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरविल्यामुळे जनतेसमोर खरे सत्य आले आहे. ‘साप साप म्हणून भुई’ बडविणार्‍यांना ही एक सणसणीत चपराक आहे, अशी प्रतिक्रिया बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी येथे दिली.

येथील हॉटेल राज पॅलेसवर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार सौ.चव्हाण बोलत होत्या. त्या म्हणाल्या, माझा उमेदवारी अर्ज अवैध होण्यासाठी विरोधकांनी देव पाण्यात ठेवले होते. न्यायालयीन लढाईत मला अडकवून तालुक्याच्या विकासकामात खिळ घालण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न फसल्याचे सिद्ध झालं आहे.

मागील आठवड्यात   विरोधकांनी माझे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केल्याची अफवा तालुक्यात पसरवली होती. मला विधानसभेची निवडणूक लढवता येणार नाही यावर त्यांनी शिक्कामोर्तंब करून जल्लोषही केला होता. तालुक्यातील जनतेची सेवा करण्याची संधी दिली. आज छाननी समितीने माझा अर्ज मंजूर केल्यामुळे त्यांना आता कोणतीही अडचण राहिली नसून यानिमित्ताने बागलाणच्या गलिच्छ राजकारणाला मूठमाती मिळाली आहे.

कोणताही सबळ पुरावा नसताना चव्हाण कुटूंबावर बोरसे कुटूंब नेहमीच बदनामीकारक तसेच जनतेची दिशाभूल करणारे वृत्त पसरवत असते. शेवटी आज पुन्हा सत्याचा विजय झाला असून येत्या ता.२१ तारखेला  जनता दिशाभूल करणाऱ्या पुढाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही सौ.चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया, शहराध्यक्ष किशोर कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dipila chavan