जिल्ह्यात पाऊणे नऊ लाख ठोंबे,19 हजार किलो मका वाटप 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

नाशिक: जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पशुधनाची उत्पादका वाढविणे यासाठी पशुसंवर्धन विभागातंर्गत येत असलेल्या वैरण विकास कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक वर्षामध्ये पाऊणे नऊ लाख ठोंबे तर 19 हजार किलो मका बियाणेचे वाटप करण्यात आले आहे. 

नाशिक: जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पशुधनाची उत्पादका वाढविणे यासाठी पशुसंवर्धन विभागातंर्गत येत असलेल्या वैरण विकास कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक वर्षामध्ये पाऊणे नऊ लाख ठोंबे तर 19 हजार किलो मका बियाणेचे वाटप करण्यात आले आहे. 

जिल्हयातील वैरण उत्पादनामधील कमतरता भरुन काढण्याकरीता तसेच पशुपालकांकडे असलेल्या पशुधनाची उत्पादकता वाढविणे व त्या अनुषंगाने जास्तीत जास्त दुग्ध उत्पादनासाठी पशुपालकांकडे असलेल्या पशुधनाला पुरेशी हिरवी वैरण उपलब्ध होण्यासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर वैरणीचे उत्पादन घेणे आवश्‍यक असते यासाठी शासनाच्या पशुसंवर्धन विकास विभागातंर्गत राबविल्या जाणाऱ्या वैरण विकास कार्यक्रमातंर्गत प्रत्येक शेतकऱ्यास (ज्या शेतकऱ्याकडे चार ते पाच जनावरे, सिंचन व्यवस्था आणि स्वत:ची शेतजमिन) वर्षाकाठी प्रत्येकी पाच किलो मका बियाणे आणि शंभर ठोंबे देण्यात येत असतात. 

मागील 2017-18 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील बिगर आदिवासी आणि आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाऊणे नऊ लाख ठोंबे वाटप करण्यात आली असून पाच किलो प्रमाणे 19 हजार 21 किलो मका बियांचे वाटप करण्यात आले आहे. या मका बियाणे आणि ठोंबे खरेदी ही शासनाकडून महाबीज मार्फेत करण्यात येवून शेतकऱ्यांस मोफत त्याचे वाटप करण्यात येत असते. 

मका आणि ठोंबे वाटप 
मका वाटप (आदिवासी क्षेत्र) - 11 हजार 413 किलो 
(बिगर आदिवासी क्षेत्र) - 7 हजार 608 किलो 

ठोंबे वाटप (आदिवासी क्षेत्र) - 5 लाख 25 हजार ठोंबे 
(बिगर अदिवासी क्षेत्र) - 3 लाख 50 हजार ठोंबे 
 

Web Title: marathi news distribution of corn