दिवाळी फराळ बनविण्यासाठी महिलांची लगबग 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

जळगाव : दिवाळी आली की, घराघरांमधून खमंग दरवळतो. दिवाळीचा फराळ आता घराच्या कोपऱ्यातील स्वयंपाकघरात नव्हे तर, उघड्यावरच घराच्या अंगणात होऊ लागला आहे. त्यामुळे फराळ करणे आता महिलांच्या सोयीचे झालेले असून त्यासाठी पसंती देखील दिली जाते. यासाठीची लगबग सुरू झाली असून, कॉलन्यांमध्ये भट्या देखील लागण्यास सुरवात झाली आहे. 

जळगाव : दिवाळी आली की, घराघरांमधून खमंग दरवळतो. दिवाळीचा फराळ आता घराच्या कोपऱ्यातील स्वयंपाकघरात नव्हे तर, उघड्यावरच घराच्या अंगणात होऊ लागला आहे. त्यामुळे फराळ करणे आता महिलांच्या सोयीचे झालेले असून त्यासाठी पसंती देखील दिली जाते. यासाठीची लगबग सुरू झाली असून, कॉलन्यांमध्ये भट्या देखील लागण्यास सुरवात झाली आहे. 

दीपोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळी जसजशी जवळ येऊ लागली, तसे महिलांची फराळ बनविण्याची लगबग वाढू लागली आहे. परंतु आजच्या धावपळीच्या युगात व नोकरी करणाऱ्या महिलांना घरी फराळ तयार करण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्याने, आचारीकडून फराळ तयार करून घेण्यावरच भर दिला जात आहे. यामुळेच शहरातील कॉलन्यांमध्ये मंडप टाकून फराळ बनविण्याचे स्टॉल लागण्यास सुरवात झाली आहे. काही ठिकाणी तर फराळ बनविण्यास सुरवात देखील झाली आहे. शेव, चिवडा, चकली, लाडू, शंकरपाडे यासाठी लागणारे सर्व साहित्य बाजारातून विकत आणून फराळ तयार करून घेण्यासाठी कारागिराला किलोप्रमाणे पैसे दिले जातात. 

कॉलन्यांमध्ये भट्ट्या पण पावसाचा व्यत्यय 
फराळ घरी तयार करण्याऐवजी तयार पाकीट किंवा साहित्य आणून हलवाईकडून बनविण्याकडे महिलांचा कल आहे. यामुळेच शहरातील कॉलन्यांमध्ये मंडप टाकून कारागिरांनी दुकाने थाटलेली पाहण्यास मिळत आहेत. परंतु, शुक्रवारपासून पावसाची रिपरिप सुरू झाल्याने भट्टी लावण्यास व्यत्यय आला आहे. शहरात बहुतांश ठिकाणी मंडप टाकलेले पाहण्यास मिळत आहे. रविवारपासून भट्टी सुरू करण्याचे नियोजन असून पावसाचा व्यत्यय आहे. पाऊस बंद राहिल्यास भट्टी सुरू होऊ शकतील असे आचारींकडून सांगण्यात आले. 

"दिवाळी फराळ करण्यासाठी भट्टी लावली असून, अद्याप फराळ बनविण्याची सुरवात झालेली नाही. पावसामुळे देखील थोडा व्यत्यय असून रविवारी किंवा सोमवारपासून फराळ बनविण्याचे काम सुरू होईल.' 
- सूरज महाराज, (केटरर्स) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news diwali festiwal faral woman