सिन्नरला भूलीचे इंजेक्शन घेऊन डॉक्टरची आत्महत्या

residentional photo
residentional photo

सिन्नर । शहरातील प्रसिद्ध भुलतज्ञ डॉ. वैजयंती अभिजित काकडे (43) यांनी राहत्या घराच्या गच्चीवर भुलीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. हि घटना आज(ता.. 2) मध्यरात्री दिडच्या सुमारास उघडकीस आली.
   नाशिक -पुणे महामार्गालगत वाजे पेट्रोल पंपासमोर डॉ. काकडे हॉस्पिटल येथे ही घटना घडली. डॉ. अभिजित काकडे हे शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ असून डॉ. वैजयंती या भूल रोग तज्ञ म्हणून सर्वांना परिचित होत्या. वर्षभरापूर्वीच वाजे पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या नवीन सुसज्ज जागेत हॉस्पिटल स्थलांतरित करण्यात आले होते. याच इमारतीत वरच्या मजल्यावर काकडे दांपत्य वास्तव्याला होते.
मध्यरात्री जाग आल्यावर डॉ. वैजयंती खोलीत नसल्याचे लक्षात आल्यावर डॉ. अभिजित त्यांना शोधण्यासाठी बाहेर आले.. हॉस्पिटल कडे जाणारा दरवाजा बंद असल्याने ते गच्चीकडे गेले असता तेथे डॉ. वैजयंती या विषारी औषध सेवन केलेल्या अवस्थेत आढळून आल्या. मयत डॉ. वैजयंती यांच्या पश्चात पती, 2 मुले असा परिवार आहे. डॉक्टरने आत्महत्या केल्याचा हा प्रकार समजल्यावर शहरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. सिन्नर पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com