esakal | बापरे..गॅस गोडावूनच फोडले; ५३६ सिलेंडर अन्‌ शेगड्या लांबविल्‍या 
sakal

बोलून बातमी शोधा

indane gas

विखरण व दोंडाईचा येथून चार किलोमिटर अंतरावर असलेल्या मे. इशरियाज इण्डेन गॅस गोडाऊन आहे. मुख्य रहदारीच्या रस्त्यावरील गोडाऊनचे कूलूप तोडून शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान झालेल्या चोरीत कमर्शिअल व घरघूती वापराचे असे एकूण 537 भरलेले सिलेंडर,

बापरे..गॅस गोडावूनच फोडले; ५३६ सिलेंडर अन्‌ शेगड्या लांबविल्‍या 

sakal_logo
By
रणजित राजपूत

दोंडाईचा (धुळे) : दोंडाईचा– धूळे रस्त्यावरील विखरण शिवारात इंण्डेण गॅस कंपनीचे असलेल्या मे. इशरियाज गॅस एजन्सीच्या गोडाऊनवर धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी पाचशे छदतीस भरलेले सिलेंडर, शेगड्या आदीसह पंधरा लाख रूपये किंमतीच्या वस्तू घेवून पोबारा केला. घटनास्थळी आमदार जयकुमार रावल व दोंडाईचा पोलीस ठाण्याचे आयपीएस अधिकारी पंकज कूमावत यांनी भेट देऊन पहाणी केली.

विखरण व दोंडाईचा येथून चार किलोमिटर अंतरावर असलेल्या मे. इशरियाज इण्डेन गॅस गोडाऊन आहे. मुख्य रहदारीच्या रस्त्यावरील गोडाऊनचे कूलूप तोडून शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान झालेल्या चोरीत कमर्शिअल व घरघूती वापराचे असे एकूण 537 भरलेले सिलेंडर, पंधराशे रुपये प्रतीनग शेगडीप्रमाणे 22 शेगळ्या, 380 रेग्यूलेटर असा दोन ट्रका भरुन पंधरालाख रुपये किमतीच्या वस्तूचीं चोरी केली.

गॅस गोडाऊनवर रोज नेहमीप्रमाणे नऊ वाजता गोडाऊनवर जाणारा मॅनेजर आसिफशेख हा रविवार असल्याने थोडा उशिराने गेला. तेथे गेल्‍यावर कूलूप तोडून गोडाऊन उघडे असल्‍याचे निदर्शनास आले. त्याने लागलीच गॅस मालक शिवान अहमद यांना संपर्क केला. त्यांनी पोलीसांना माहिती दिल्‍यानंतर ते तात्काळ पोलीस अधिक्षक पंकज कूमावत यांच्यासह घटनास्थळी जाऊन पहाणी केली. यावेळी आमदार रावलही होते.

वॉचमन रजेवर तर, तेथे विद्यूत पूरवठा नाही
गोडावूनवर नेहमी रात्रपाळीला वॉचमन असतो. पंरतु, तीन दिवसांपासून वॉचमन रजेवर आहे. तसेच गॅसही स्फोटक ज्वलनशील असल्याने विद्यूत पूरवठा बंद होता. यामुळे सीसीटीव्ही कॅमेरा देखील लावता आला नाही. यामुळे चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर एक आव्हान बनले आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या पहाणीत पत्र्याच्या शेडमध्ये सिगारेट व शेंगा खाल्याचे टरफले आढळून आले.

साहेब ! चोऱ्याचे प्रमाण वाढतेय
चोरी झालेल्या गॅस गोडाऊनवर आमदार रावल यांनी भेट दिली असता त्‍यांनी पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना शहरात चोऱ्याचे प्रमाण वाढल्‍याचे सांगितले. चोऱ्यांसह अनेक गुन्ह्यांमध्ये वाढ होत चालली असून पोलीस यंत्रणेचा कारभार ढिसाळ होत जात असल्‍याबाबत नाराजी व्यक्‍त करत रात्रीची गस्त वाढविण्याचे रावल यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले.

संपादन ः राजेश सोनवणे