ग्रामसेवकांची  वेतनवाढ रोखणार,सीईओ गीतेचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

नाशिक: 1 एप्रिल पर्यंत ग्रामपंचयतींनी करमागणी करणे गरजेचे  आहे. मात्र  ती केली नसल्याने येत्या दोन दिवसांमध्ये जर करमागणी नोंदली गेली नाही. तर सर्व ग्रामसेवकांची एक वेतनवाढ बंदचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहे. यावर दोन दिवसांमध्ये करमागणी नोंदविण्याचे आश्‍वासन ग्रामसेवकांनी दिले आहे. 

   जिल्ह्यातील येवला तालुकासह सतर काही तालुक्‍यांकडून पाणीपट्टी व घरपट्टीची मागणी केली नसल्याची बाब येवला तालुक्‍याच्या आढवा बैठकीत समोर आली. 1 एप्रिलपर्यंत ही करमागणी नोंदविणे आवश्‍यक असतानाही याला दीड महिन्यांचा कालावधी उलटूनही अनेक ग्रामसेवकांकडून करमागणी नोंदविली गेली नसल्याची माहिती विस्तार अधिकाऱ्यांनी मांडलेल्या अहवालामधून समोर आल्याने सदरची बाब गंभीर असताना देखील यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात न आल्याने जर येत्या 48 तासामध्ये तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचयातींनी कर मागणी न नोंदविल्यास गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्यामार्फेत या सर्व ग्रामसेवकांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी दिले आहे.

Web Title: MARATHI NEWS DR GITE ACTION

टॅग्स