सटाण्यात तोतया सीआयडी पोलीसाने सराफाला अडीच लाख रुपयांना लुटले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

सटाणा : आम्ही सीआयडी पोलीस असून सटाणा शहरात सापडलेल्या दोन लाख रुपयांच्या अंमली पदार्थ प्रकरणी तुमची चौकशी करायची आहे, असे बतावणी करत अज्ञात चोरट्यांनी शहरातील प्रतिष्ठीत सराफ व्यापाऱ्याकडील अडीच लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना आज शुक्रवारी  भरदिवसा दीड वाजेच्या सुमारास घडली. या दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news duplicate police

टॅग्स