तिकीट नको म्हणून माझी मुलगी ढसाढसा रडत होती, का दिलं? : खडसेंचा संतप्त सवाल 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

माझ्यासाठी तिकीट मागितले होते. तिकीट नको म्हणून मुलगी रडली; तरी देखील तिला तिकीट देवून मला बाजूला सारण्यासाठी जाणूनबुजून तिकीट नाकारल्याचा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. 

जळगाव : एकनाथ खडसे यांना विधान परिषदेचे तिकीट नाकारण्यात आले. याबाबत विधानसभेला खडसेंच्या मुलीला तिकीट देण्यात आल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. पण सुनेला तिकिट दिले, मुलीला तिकीट दिले म्हणून आता विधान परिषदेला दिले नसल्याचे सांगतात. पण मुलीसाठी नव्हे; माझ्यासाठी तिकीट मागितले होते. तिकीट नको म्हणून मुलगी रडली; तरी देखील तिला तिकीट देवून मला बाजूला सारण्यासाठी जाणूनबुजून तिकीट नाकारल्याचा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. 

एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी काही बाबींवर भाष्य केले. विधानसभेचे तिकीट दिल्यानंतर विधान परिषदेचे देत नाहीत, हा पक्षाचा नियम असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. पंकजा मुंडेना विधानसभेचे तिकीट दिले होते. रोहिणी खडसे यांना तिकीट दिले होते; अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली होती. त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर एकनाथ खडसे यांनी एका मुलाखतीतून प्रदेशाध्यक्ष पाटील यांना सडेतोड उत्तर दिले. 

नाथाभाउंसारखा स्पर्धक नको होता 
खडसे यांनी म्हटले आहे, की माझ्या सुनेला, मुलीला तिकीट दिले. पण मुलीसाठी आम्ही कुठे तिकीट मागितले होते? ते माझ्यासाठीच मागितले होते. मला तिकीट नको म्हणून मुलगी रडत असताना देखील तिला जबरदस्ती तिकीट का दिले? केवळ नाथाभाऊंसारखा स्पर्धक तयार व्हायला नको होता. इथे मला व्यक्तिगत मानणारा वर्ग आहे, माझी मुलगी निवडून येणार नाही. तरी जबरदस्ती तिकीट दिल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news eknath khadse bjp vidhansabha election ticket daughter