राज्यात 53 टोलनाके करमुक्त,उर्वरित बंदची माहिती खासगीत देतो-एकनाथ शिंदे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

नाशिक- राज्यात भाजप-शिवसेना युती सत्तेवर येण्यापुर्वी टोल मुक्त महाराष्ट्र करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. सत्तेचा कालावधी पुर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता 53 टोलनाके बंद केल्याची माहिती त्यांनी दिली.अजून किती टोलनाके बंद करणार,या प्रश्‍नावर खासगीत सांगतो असे उत्तर देत काहीसे भडकलेल्या शिंदे यांनी स्वताला सावरण्याचा प्रयत्न केला. 

विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यात टोलनाक्‍यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. राज्यात दर महामार्गांवर दरअर्धा तासाने टोल भरावा लागतं असल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत. मनसेने लोकांमधील संताप ओळखून राज्यभरात आंदोलनही केले. टोलनाक्‍यांच्या प्रश्‍नाची दाहकता लक्षात घेऊन युती सरकारने राज्य टोलमुक्त करण्याचे आश्‍वासन दिले. सत्ता आल्यानंतर आश्‍वासनाची पुर्ती झाली खरी,पण कमी खर्चाच्या नाके टोल मधून वगळण्यात आले होते. संपुर्ण टोल नाके मुक्त करण्याच्या आश्‍वासनांची आठवण म्हणून नाशिक दौऱ्यावर आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्‍न विचारला असता त्यांनी 53 टोलनाके करमुक्त केले. मात्र अजून किती टोलनाके करमुक्त करणार या प्रश्‍नावर शिंदे भडकले मात्र खासगीत सांगतो असे वक्तव्य करून चॅनेलच्या कॅमेऱ्यांसमोर स्वताला सावरले. 

पुणे महामार्गावर 10 किलोमीटरचा बोगदा 
मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर ते सिंहगढ दरम्यान दहा किलोमीटरचा बोगदा तयार केला जाणार असून त्यासाठी सात हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे मंत्री शिंदे यांनी सांगितले. यामुळे मुंबई-पुणे हे महामार्गावरील अंतर अर्धा तासाने कमी होणार असल्याची स्पष्टीकरण दिले. रस्ते रुंदीकरण करायचे म्हटल्यास टोल तर लागणारचं अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news eknath shinde