जिल्ह्यात 18 ग्रामपंचायतींत उद्या मतदान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

नाशिकः जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींमध्ये येत्या शनिवारी (ता. 31) सार्वत्रिक मतदान होत आहे. त्यात नाशिक तालुक्‍यातील संसरी आणि शिवणगावचा समावेश आहे. 

नाशिकः जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींमध्ये येत्या शनिवारी (ता. 31) सार्वत्रिक मतदान होत आहे. त्यात नाशिक तालुक्‍यातील संसरी आणि शिवणगावचा समावेश आहे. 
जिल्ह्यातील 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी सहा ग्रामपंचायतींत बिनविरोध निवडणुका झाल्या, तर एका ठिकाणी उमेदवारांचे अर्जच आले नाहीत. त्यामुळे आता नाशिक संसरी, शिवणगाव, मालेगाव तालुक्‍यात पोहाणे, लुल्ले, पळसदरे, निफाड तालुक्‍यात धरणगाव व खडक माळेगाव, येवला तालुक्‍यात जउळके, निळखेडे, गुगलगाव, पांझरगाव, बागलाण तालुक्‍यात मोरपुरे, अंबापूर, जाड वायगाव, पिंपळगाव, निलवाड, खामनेर, दहिदुंले या गावात शनिवारी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी निवडणूक विभागाने 81 बॅलेट युनिट व तितक्‍याच कंट्रोल युनिटची व्यवस्था केली आहे. गुरुवारी (ता.29) सायंकाळी प्रचाराचे ताबूत थंडावले. नाशिक तालुक्‍यात संसरी येथे निवडणुकीत चुरस आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news election