जिल्ह्यात तीनपर्यंत 41.18 टक्‍के मतदान; जळगाव शहरात सर्वात कमी 

live photo
live photo

जळगाव ः जिल्ह्यात पावसामुळे मतदानावर विपरीत परिणाम झाल्याचे दुपारी तीन पर्यंत स्पष्ट झाले आहे. दुपारीतीन पर्यंत अकरा मतदार संघात एकूण 41.18 टक्केच मतदान झाले. सर्वाधिक मतदान अमळनेर मतदार संघात 48 टक्के तर सर्वात कमी मतदान जळगाव शहर मतदार संघात 29 टक्के झाले आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात 50 टक्‍के मतदान 
आदिवासी जिल्हा असलेल्या नंदुरबारमध्ये आतापर्यंत खानदेशातून सर्वाधिक मतदान झाले आहेत. आदिवासी भाग असला तरी मतदान करणाऱ्यांच्या केंद्रावर रांगा लागल्या असून, दुपारी तीनपर्यंत 50.26 टक्‍के मतदान झाले आहे. 

जळगाव जिल्ह्यातील मतदानाची टक्‍केवारी 
चोपडा--42.91 
रावेर-47.34 
भुसावळ--30.0 
जळगाव शहर--29.2 
जळगाव ग्रामीण--41.10 
अमळनेर--48.31 
एरंडोल--42.19 
चाळीसगाव--42.85 
पाचोरा--39.89 
जामनेर--46.40 
मुक्ताईनगर--47.61 
एकूण--41.18 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com