सहाय्यक खर्च निरीक्षकाविरुद्ध  चांदवडला गुन्हा दाखल, निवडणूक कार्यात कसूर केल्याचा ठपका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

गणूर : विधानसभेच्या निवडणुकीस शुक्रवार (ता. 27)पासून सुरवात झाली. निवडणूक कामासाठी नेमणूक झालेल्या अधिकाऱ्याने कर्तव्यात कसूर केली. चांदवड-देवळा मतदारसंघाचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या तक्रारीवरून चांदवड पोलिस ठाण्यात सहाय्यक खर्च निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

एस. बी. बर्वे असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, विधानसभा निवडणुकीत उमेदवारांकडून प्रचारावर किती खर्च होतो, याचा तपशील ठेवण्यासाठी त्यांची सहाय्यक खर्च निरीक्षकपदी नेमणूक झाली होती. शुक्रवारी त्यांनी चांदवड प्रशासकीय इमारतीत निवडणूक कामासाठी उपस्थित राहणे अपेक्षित होते. वेळोवेळी संपर्क करूनही ते उपस्थित न राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री. भंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बर्वे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news election officer crime