जळगाव शहरात पैसे वाटपाच्या संशयावरून गोंधळ 

जळगाव शहरात पैसे वाटपाच्या संशयावरून गोंधळ 

जळगाव ः विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान सायंकाळी शहरातील जुने जळगाव परिसरात पैसे वाटपाच्या संशयावरून गोंधळ उडाला. यात एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया आज झाली. जिल्ह्यातील शंभर उमेदवार रिंगणात असून 6 हजार 666 केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. सकाळी सात वाजेपासून सुरू झालेल्या प्रक्रिया शांततेत सुरू होती. शिवाय मतदान केंद्रावर देखील दुपारनंतर गर्दी झालेली पाहण्यास मिळाली. यामुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रावर सायंकाळी पाचपर्यंत 55 टक्‍के मतदान झाले होते. तर सहा वाजेनंतर मतदानाची प्रक्रिया थांबली असताना काही केंद्रावर रांगा लागलेल्या होत्या. भडगाव शहरात मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा असल्याने मतदान पुर्ण व्हायला एक ते दिड तास लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. तसेच धरणगाव शहरात देखील रांगा आहेत. 

शहरात गोंधळ 
शहरातील काही भागात दुपारी चारनंतर पैसे वाटप होत असल्याची चर्चा सुरू होती. यात प्रामुख्याने शाहूनगर, पिंप्राळा हुडको, जुने जळगाव या भागात पैसे वाटप सुरू होती. दरम्यान जुने जळगाव परिसर असलेल्या कोल्हे वाड्यात मतदारांना पैसे वाटप होत असल्याच्या बातमीवरून गोंधळ उडाला. याची माहिती मिळाल्यानंतर साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहून एकच गोंधळ उडाला. वाटप करणाऱ्यासह गर्दीने पळ काढला. यात सुजय एकनाथ कोल्हे (वय 45) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com