पुढील महिन्यापासून महापालिकेची  पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नाशिक ः उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याचे आदेश देण्यात आले होते. महापालिकेने 2016 मध्ये पाचशेहून अधिक धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे केले. उर्वरित धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यासाठी उच्च न्यायालयाकडून विचारणा होत असल्याने आता महापालिकेने उर्वरित 405 धार्मिक स्थळे हटविण्याची तयारी सुरू केली आहे. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या सणासुदीच्या काळात कारवाई सुरू केल्यास शहरात तणाव निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

सन 2010 मध्ये उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले होते. राज्यभर आदेश लागू असले, तरी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळे हटविण्यात आली. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात 908 धार्मिक स्थळे आढळली. त्यातील 503 धार्मिक स्थळांचे अतिक्रमण महापालिकेने काढले आहे. उर्वरित अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू करून न्यायालयासमोर संपूर्ण अहवाल सादर करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जाणार आहेत. 

Web Title: marathi news encroachment expedition

टॅग्स