पालवी फाऊंडेशनतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 

residentional photo
residentional photo

नाशिक  ::येथील पालवी फाऊंडेशनतर्फे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात येईल. त्यात शाळा-महाविद्यालयांमार्फत त्यांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जाईल. त्याचा एक गट, तर नाशिकमधील कुटुंबिय असा दुसरा गट असेल. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आणि प्रमाणपत्र दिले जातील. स्पर्धेत अधिक विद्यार्थी सहभागी होणाऱ्या एका शाळेला आणि एका महाविद्यालयाला विशेष बक्षिस आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 

फाऊंडेशनतर्फे बंधारे बांधणे, तलावाचे खोलीकरण, आरोग्य शिबिर, आश्रमशाळांसाठी सौरऊर्जा प्रकल्प, शालेय विद्यार्थी आणि आदिवासी बांधवांसाठी कपडे-खेळणी वाटप असे उपक्रम राबवण्यात  येतात. अमोनियम बाय-कार्बोनेट पावडरचे वितरण करण्यात आले. जल, ध्वनी, घातक वायूमुळे पर्यावरणास होणारे धोके व दुष्परिणाम आणि ते टाळण्यासाठी पर्यावरण संरक्षणाची माहितीपटाची निर्मिती फाऊंडेशनने केली. हा माहितीपट शहरातील 400 शाळा व महाविद्यालयात दाखवण्यात आला.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव या विषयावर निबंधआणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना सायकल, घड्याळ, स्कूल बॅग अशी बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील गणेश कलाकृतींचे वीस दिवस प्रदर्शन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ललित कला महाविद्यालयात भरवण्यात आले. पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या चळवळीमुळे दरवर्षीपेक्षा गेल्यावर्षी 70 हजार मूर्तींचे नदीत विसर्जन झाले नाही, अशी माहिती फाऊंडेशनच्या डॉ. सुवर्णा पवार आणि डॉ. राजश्री कुटे यांनी दिली. 

स्पर्धेचे नियम 
0 गणरायाच्या शाडू मातीच्या मूर्ती सहभागी करुन घेण्यात येणार नाहीत 
0 गणरायाची मूर्ती नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात यावी. कापूस, डाळी, धान्य, नारळ, लाकूड, सुपारी आदींचा त्यात समावेश आवश्‍यक असेल आणि हळद, बीट, पाने अशांपासून तयार केलेला नैसर्गिक रंग वापरलेला असावा 
0 कुटुंबाने आणि शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जन घरच्या घरी पर्यावरणपूरक करणे अपेक्षित आहे 
0 नैसर्गिक साधनांपासून व कल्पकतेने सजावट केलेली असावी. सजावटसाठी थर्माकोल, प्लास्टिकचा वापर करण्यात येऊ नये 
0 लाकडी व धातूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व दरवर्षी पुनर्वापर हा एक चांगला मार्ग असेल 
0 गणेशोत्सवात सामाजिक संदेश देण्यासाठी स्पर्धकांना अतिरिक्त गुण मिळतील 
0 गणेश कलाकृती व सजावटीचा फोटो 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरपर्यंत गणेश विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करत विसर्जनाचा फोटो 27 सप्टेंबरपर्यंत पाठवायचा 
0 गणेश कलाकृती व सजावटीची शंभर शब्दांमध्ये माहिती सोबत पाठवायची आहे. फोटोसोबत स्वतःचे नाव, पत्ता, दूरध्वनी अथवा मोबाईल क्रमांक, शाळा-महाविद्यालयाचे नाव व पत्ता, मुख्याध्यापकांचे नाव आणि दूरध्वनी अथवा मोबाईल क्रमांक ही पाठवायची 
0 फोटो आणि माहिती मोबाईल क्रमांक 9834564454 यावर व्हॉटस्‌-ऍप करायची
 

स्पर्धेतील दोन्ही फोटोंचे एकत्रित परीक्षण करुन गुण देण्यात येतील. फाऊंडेशनची स्पर्धा परीक्षण समिती ठराविक स्पर्धकांच्या घरी परीक्षण करण्यासाठी भेट देईल. स्पर्धेचा निकाल गणेश विसर्जनानंतर एका आठवड्यानंतर जाहीर केला जाईल. शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना कळवण्यात येईल. 
- डॉ. सुवर्णा पवार आणि डॉ. राजश्री कुटे (पालवी फाऊंडेशन)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com