इव्हीएम मशिनविरोधात बहुजनक्रांती मोर्चातर्फे घोषणाबाजी करत जेलभरो 

live
live

नाशिक : मतदानासाठी वापरण्यात आलेल्या इव्हीएम मशिन लोकशाहीसाठी आणि भारतीय संविधानासाठी धोका असल्याचे सांगत, त्याविरोधात देशभर आंदोलन करणाऱ्या बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज घोषणाबाजी करत आंदोलन पुकारले. सरकारवाडा पोलिसांनी आंदोलकांना अटक करत त्यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहुजन क्रांती मोर्चाच्या नाशिक शाखेच्या पदाधिकारी ऍड. सुजाता चौधंवे, डॉ. विराज दाणी यांच्या नेतृत्वाखाली अशोकस्तंभ येथे इव्हीएम मशिनविरोधात जेलभरो आंदोलन पुकारले. संजय वाघ, काशिनाथ खळे, राजेंद्र गाढे यांच्यासह सुमारे 35-40 कार्यकर्त्यांना अटक  केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com