गोठ्यातल्या लक्ष्मींच्या चाऱ्यासाठी घरच्या लक्ष्मीचे मंगळसूत्र गहाण

live
live

निमोण -   गोठ्यातल्या लक्ष्मी च्या चार्यासाठी घरच्या लक्ष्मी चे मंगळसूत्र बँकेत गहाण.निमोण ता.चांदवड येथील शेतकऱ्यांने आपल्या जनावरांना जगविण्यासाठी चक्क आपल्या सौभाग्यवती चे दोन तोळे सोने एका पतसंस्थेत गहाण ठेवले.चांदवडच्या पूर्व भागातील दुष्काळाची दाहकता दाखविणारे हे प्रातिनिधिक उदाहरण. आख्खा पावसाळा गेला तरी पाऊस झाला नाही. पेरलेले उगले पण हाती काहीच आले नाही. काळया आईवर जिव लावणार्या ईथल्या बळीराजा चा जिव मात्र दुष्काळाने टांगणीला लागला. बाजरी मका या सारखी चार्याची पिके देखील आली नाही. कांद्याच्या पिकाने तर जवळ असलेले थोडे फार पैसे मातीत टाकले.पिके ही नाही आणि पैसे ही नाही. बँकांचे आदीचेच कर्ज. सावकार दारात उभे करीत नाही.अशा परीस्थिती त जनावरांच्या चारा व पाण्यासाठी बळीराजाला आपल्या घरच्या लक्ष्मी चे दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली आहे.


       निमोण ता.चांदवड येथील रामदास सोनवणे यांना वडीलोपार्जित एक एकर शेती.त्यांच्या कडे पाच गायी आहेत.दरवर्षी त्यांना जनावरांच्या चार्याची व पाण्याची चिंता नसायची.यावर्षी पाऊस झाला च नाही. इतर पिके नाही. उत्पन्न अजिबात नाही. मुलांचे शिक्षण व कुटुंब चालवताना मोठी कसरत करावी लागते आहे. अशा परिस्थितीत ज्या जनावरांना पोटच्या पोरासारखं जपलं त्यांना ही दुष्काळात जगवायचं.यासाठी त्यांनी मालेगाव तालुक्यातून सहा एकर मक्याच्या चारा घेतला. चारा घरी आणेपर्यंत त्यांना पन्नास हजार रुपये खर्च येणार आहे. जवळ दमडी नाही. म्हणून त्यांनी आपल्या पत्नीचे दोन तोळे दागिने एका पतसंस्थेत गहाण ठेवले.
     

अशीच काहीशी अवस्था या परिसरातील बळीराजाची आहे. चार्याची वाहतूक करताना जिव धोक्यात घालावा लागतो आहे. मोठी कसरत करून चारा घरापर्यंत येतो. एक एक ट्राली चार्यासाठी भटकंती करावी लागत आहे. निमोण, दरेगाव, वाद, वराडी, डोणगाव, कुंदलगाव, कानडगाव, दहेगाव, शिंगवे, मेसनखेडे या परिसरातील शेतकरी येवला, निफाड, कोपरगाव, मालेगाव, देवळा या तालुक्यातून चारा आणण्यासाठी रोज धावपळ करीत आहे.


       या भागात शासनाने चारा व पाण्यासाठी व्यवस्था करावी. शेतकऱ्यांना आपल्या सर्जा राजाला वाचवण्यासाठी मदत करावी एवढीच अपेक्षा.
* यावर्षी चा दुष्काळ एकोणीशे बहात्तर पेक्षाही भयानक आहे. जनावरांना जगविण्यासाठी आम्हाला मोठी कसरत करावी लागत आहे.
      रामदास सोनवणे, निमोण ता.चांदवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com