कर्जबाजारीपणाला कंटाळून दाभाडीत युवा शेतकऱ्याने संपवले जीवन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

दाभाडी- सेवा सोसायटीसह व्यापारी बँकेचा कर्जाचा डोंगर आणि अवकाळी पावसाने खरीपाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने येथील अल्पभूधारक शेतकरी मोहन जिभाऊ निकम या शेतकऱ्याने विष पिऊन स्वतःचे जीवन संपवले. ककर्जाची परतफेड अन अवकाळीचे नुकसान यामुळे कुटुंब चालवायचे कसे या प्रश्नाच्या गर्तेत सापडलेल्या या शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मोहन निकम त्रिवेणी शिवारात वास्तव्य करतात. सेवा सोसायटीसह मर्चंड बँक आणि हात उसनवारी मिळून जवळपास साडे पाच लाख रुपयांचे कर्ज होते. कर्जफेड आणि कुटुंबाचे संगोपन याचं गणित बिघडल्याने मोहन निकम हा युवा शेतकरी अस्वस्थ होता. कर्जाची चिंता सतावत असतांना त्यात अवकाळी पावसाने संपूर्ण खरीप पिकाची नासाडी केल्याने जगण्याचे साधनच हिरावले गेले.या विवंचनेत या शेतकऱ्यांने जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात वृद्ध विधवा आई, पत्नी वंदना आणि दोन मुलांसह शेत मळ्यात वास्तव्य करतात.अवघ्या दीड एकर शेतीतून गुजराण करतात.

घरातील कर्ता पुरुषच सोडून गेल्याने निकम परिवारावर आभाळच कोसळले आहे. शेतमळ्यात सर्वांच्याच मदतीला नेहमी धावून येणारा आणि शिवारात सर्वांशी हसरा संवाद साधणारा सोबती गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शवविच्छेदन सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. युवासेनेचे अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी नुकतीच दाभाडी भेटीत याच शेतकऱ्याच्या शेतातील उद्ध्वस्त पिकाची पाहणी केली होती. यावेळी श्री.ठाकरे यांनी कर्जमाफीविषयी शेतकऱ्यांना आश्वत केले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news faramer suicide