अर्धनग्न अवस्थेतील कृष्णा डोंगरेचे शरद पवारांना निवेदन

live
live

नाशिकः शेतीला जोपर्यत योग्य भाव मिळत नाही,तोपर्यत शर्ट न परिधान करण्याचा संकल्प करणाऱ्या नगरसूल (ता.येवला) येथील शेतकरी कृष्णा डोंगरे या शेतकऱ्यांने आज अर्धनग्न अवस्थेत माजी केंद्रीय कृषीमंत्री,राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निफाड येथे भेट घेत निवेदन सादर केले. श्री.पवार महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ श्री.पवार निफाडला आले होते. व्यासपीठाच्या परिसरात श्री.डोंगरे अर्धनग्न अवस्थेत फिरतांना दिसताच श्री.पवार यांनी त्यांना व्यासपीठावर बोलवून घेत चर्चा केली.श्री.डोंगरे यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घाबरू नये,आपल्या मागण्या लवकरच मान्य होणार असून 26 मेनंतर मी आपल्याला शर्ट पाठवून देईल,असे आश्वासन दिले. या सभेत अर्धनग्न डोंगरे यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com