आम्हाला तुम्हीच सांगा जगावं का मरावं....!

भाऊसाहेब गोसावी
Thursday, 7 November 2019

निमोण - माझं कर्मच वाहुन गेलं.पावसानं आमचं उपजीविकेचं साधनच वाहुन नेलं आता आम्ही जगायचं तरी कसं.तीन दिवसांपासून वाट पाहतो आहे आमच्यापर्यंत कोणीच आलं नाही.आम्हाला सांगा तरी जगावं का मरावं असा मन हेलावुन टाकणारा आक्रोश केला आहे निमोण ता.चांदवड येथील रहिवासी ज्ञानेश्वर भास्कर सोनवणे यांनी.त्यांचं दहेगाव शिवारात सव्वा दोन एकर शेत आहे.

निमोण - माझं कर्मच वाहुन गेलं.पावसानं आमचं उपजीविकेचं साधनच वाहुन नेलं आता आम्ही जगायचं तरी कसं.तीन दिवसांपासून वाट पाहतो आहे आमच्यापर्यंत कोणीच आलं नाही.आम्हाला सांगा तरी जगावं का मरावं असा मन हेलावुन टाकणारा आक्रोश केला आहे निमोण ता.चांदवड येथील रहिवासी ज्ञानेश्वर भास्कर सोनवणे यांनी.त्यांचं दहेगाव शिवारात सव्वा दोन एकर शेत आहे.

     शुक्रवारी आलेल्या अतीपावसाने त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दोन एकरात लावलेल्या कांदा पिकापैकी.काढणीला आलेल्या एक एकरातील कांदे व जमिनीतील पूर्ण माती वाहून गेली. पाइपलाइन वाहून गेली. उरलेले एक एकर कांदे देखील पुर्ण खराब झाले आहे.
          भास्कर सोनवणेंंचं सहा जनांचं कुटुंब या जेमतेम अडीच एकर शेतीत कष्ट करून उपजीविका करत होते. इतके दिवस त्यांनी उसतोडणीसह मजुरी करून मुलांना साभांळलं लहानचं मोठं केलं.आता मुले मोठी झाली ,सुना आल्या .चार वर्षांपूर्वी पत्नी दोन्ही मुले व सुनांच्या मदतीने त्यांनी आपली पडीत असलेली वडीलोपार्जीत जमीन करायला सुरुवात केली. कुटुंबाच्या कष्टाने खरंच ओसाड असलेलं रान हिरवं केलं .

     मागच्या दोन वर्षांचे कर्जच फेडता आलं नाही. आता यावर्षी पुन्हा इकडून तिकडून उसनवारी करून कर्ज करून पिक उभं केले होते. आता वाटलं होतं कांद्याला चांगला भाव आहे. चांगले पैसे होतील कर्ज फिटल .या पावसानं त्यांचं हे स्वप्नच राहिलं.
    भास्कर किसन सोनवणे
शेती -.सव्वादोन एकर
दोन एकर - कांदे
झालेला खर्च - पंच्यांन्नव हजार रूपये ( कुटुंबाचे कष्ट वेगळे)
झालेली हानी
एक एकर काढणीला आलेले कांदा पीक पुर्ण वाहून गेले - आजच्या बाजारभावानुसार नुकसान साडेतीन लाख रूपये
एक एकर खराब झालेला कादे.- दोन लाख रूपये
एक एकर शेती वाहून गेली - दोन लाख रूपये
पाइपलाइन - पन्नास हजार रुपये
खर्चासह एकुण नुकसान - अंदाजे नऊ लाख रूपये

दोन दिवसांपूर्वी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर सोनवणे यांनी आपली कैफियत आमदार महोदयांसमोर मांडली . मात्र अद्यापही त्यांच्या बांधावर कुणी अधिकारी कर्मचारी आले नाही. त्यांना साधा दिलासा सुद्धा कोणी दिला नाही।यामुळे हे कुटुंब खरोखरच हतबल झालं आहे.

 आता आम्हाला विष पेऊन आत्महत्या करायची वेळ आलेली आहे. आमचं उपजीविकेचे साधनच गेलं आमच्याकडे कोणीच पाहत नाही. कोणी वालीच आता राहिले नाही..
   ज्ञानेश्वर सोनवणे, निमोण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news farmer problem