नाल्यावरील उगमस्त्रोत सुरू करण्यासाठी चार गावांमधील शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा 

प्रशांत बैरागी
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नामपूर : कोटबेल ( ता. बागलाण ) येथील वनविभागाच्या हद्दीतील गहिमन नाल्यावरील वहिवाटीची उगमस्त्रोत अनधिकृतपणे बंद केल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोराणे, फोपीर, आसखेडा, द्याने येथील शेतकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत आसखेडा ( ता बागलाण ) येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच जया सावळा यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. 

गेल्या आठ दहा वर्षापासून पावसाचं प्रमाण घटल्यामुळे गोराणे, फोपीर, द्याने, आसखेडा येथील गावांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी सदर गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. भूजल पातळीत कमालीची घट झाल्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढला आहे.

कोटबेल येथील नागरिकांनी जेसीबी यंत्राचा वापर करून गहीमन नाल्यावरील वहिवाटीचे उगमस्त्रोत बंद करून वनविभागाच्या जागेत अतिक्रमण केले आहे. तसेच पाण्याच्या नैसर्गिक दिशेत बदल केल्यामुळे या चारही गावांवर दुष्काळी परिस्थिती ओढवल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याबाबत वारंवार निवेदने देऊन, तक्रारी करूनही कोणतीही उपाययोजना होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबद्दल संशयाचे वातावरण आहे. गेल्या दहा वर्षापासून प्रशासनाकडे याचा पाठपुरावा सुरू असूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकामी लक्ष घालून सदर नाल्यावरील उगमस्त्रोत मोकळे करून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा यंदाच्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण झाल्यानंतर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर दयाने येथील सरपंच सरिता कापडणीस, उपसरपंच भास्कर कापडणीस, पंकज कापडणीस, अरुण कापडणीस, भरत कापडणीस, नितीन कापडणीस, मधुकर कापडणीस, संदीप कापडणीस, आसखेडा येथील सरपंच जया सावळा, योगेश सावळा, गोराणे येथील सुरेश देसले, चिंतामण दिसले, सुनील जाधव, यशवंत देसले, दिनेश देसले आदींनी केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news farmer sucide andolan