पांडवलेणीवरून पडून व्यायामपटू जखमी

live
live

इंदिरानगरः पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या आणि पाय घसरून खाली पडलेल्या बाळू धनाजी सुरसे(52)रा.उत्तमनगर सिडको यांना रेस्क्यू करण्यात वैनातेय गिर्यारोहन गिरीभ्रमन संस्थेच्या सदस्यांना आणि पोलिसांना यश आले आहे.

आज सकाळी सहा वाजता ते एकटे ट्रेकिंगसाठी गेले होते. त्यादरम्यान पाय घसरून ते  वीस फूट खोल खाली खड्ड्यात पडले. तब्बल चार तासानंतर एकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने  शहरात कार्यरत असणाऱ्या माजी पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे यांना ही माहिती दिली. त्यांनी त्या संबंधित असलेल्या गिर्यारोहकांच्या ग्रुप वर ही माहिती टाकली .त्यानंतर आलेल्या सतीश कुलकर्णी रोहित हिवाळे, बाळासाहेब चुंबळे, चेतन खर्डे, भाऊसाहेब खानबहाले यांच्यासह इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण आणि इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना रेस्क्यू करण्यात आले .दरम्यान सुरसे हे जखमी झाले असून त्यांना गंगापूर रोड रस्त्यावरील श्रीगुरुजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com