जिल्ह्यात पाच अपघात...वडीलांसाठी नाही आणू शकला औषधी 

mahesh patil allahudin tadvi
mahesh patil allahudin tadvi

जळगाव : जळगाव जिल्ह्यासाठी सोमवारची पहाट संकटाची ठरली. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात पाच अपघात होवून पाच जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहे. यात कुसूंबा (ता. जळगाव), कुऱ्हापानाचे, नशिराबाद, यावल, विदगाव येथे सदर अपघात झाल्याच्या घटना झाल्या. सदर अपघातात माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या वाहनाला मद्यधुंद कारचालकाने मागून धडक दिली. यामध्ये डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या संचालिका डॉ. वर्षा पाटील या जखमी झाल्या आहेत. 

भरधाव दुचाकी एकमेकांवर आदळल्या 
भरधाव दुचाकी एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात दोघाही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास हिंगोणा गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार अल्लाउद्दीन मुबारक तडवी (फैजपूर) व पंखा पवार (हलखेडा, ता.मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी फैजपूर पोलिसात मयतांविरुद्ध मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. पंखा पवार हे प्लॅटीना (एम.एच.19 ई.ई.9787) वरून हितेश दारासिंग पवार (हलखेडा) यांच्यासोबत जात होते. या दरम्यान समोरून भरधाव वेगाने येणारी विना क्रमांकाच्या हिरो होंडावरून अल्लाउद्दीन मुबारक तडवी (फैजपूर) व नबाब मुराद तडवी (फैजपूर) व शरीफ लतीफ तडवी (फैजपूर) हे ट्रीपल सीट जात होते. दोन्ही भरधाव दुचाकी एकमेकांवर आदळल्याने अलाउद्दीन तडवी व पंखा पवार यांच्या डोक्‍याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले. अपघातप्रकरणी हिंगोणा पोलिस पाटील दिनेश बाविस्कर यांनी फैजपूर पोलिसात फिर्याद दिल्यावरून दोघाही मयत दुचाकीस्वारांविरुद्ध मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक जिजाबराव पाटील करीत आहेत. 

रूमाल बांधायला थांबला अन्‌... 
वडीलांसाठी औषधी घेण्यासाठी विरवाडा (ता. चोपडा) येथील महेश दीपक म्हाळके (वय 22) हा वडीलांची औषधी घेण्यासाठी दुचाकीवरून (क्र.एम.एच. 19, सीएल 2297) मित्र चेतनसोबत जळगावी येत होता. परंतु चोपडा- विदगाव मार्गावर देवगावजवळील चेरी फॅक्‍टरीच्या समोर तोंडाला रूमाल बांधण्यासाठी गाडी उभी केली होती. याच दरम्यान मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (एम.एच. 19, सीएफ 4870) मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात महेश हा चाळीस फुट लांब फेकला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com