पूरपंचनाम्याचे कामकाज अद्याप अपूर्णच 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

नाशिक ः जिल्ह्यातील महापुराने बाधित झालेल्या पूरग्रस्तांच्या पंचनाम्याचे कामकाज अद्याप अपूर्णच आहे. आतापर्यंत पाच हजार 627 पूरग्रस्तांना प्रशासनाने धान्याचे, तर पूरग्रस्तांना तत्काळ मदतीपोटी पाच तालुक्‍यांना नऊ कोटी रुपयांचे वाटप सुरू केले आहे. 
महापुराने बाधित झालेल्या कुटुंबांना तत्काळ मदतीसाठी प्रतिकुटुंब सात हजार 500 रुपयांच्या मदतवाटपाचे काम सुरू आहे. गेल्या आठवड्यातील गोदावरी व दारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे पाच हजार 627 कुटुंबे बाधित झाली होती. संबंधित विस्थापित कुटुंबांना प्रशासनाने तात्पुरत्या निवारा केंद्रांत स्थलांतरित केले. त्यात इगतपुरी, निफाड 

तालुक्‍यातील सर्वाधिक सुमारे दोन हजार 500 कुटुंबांचा समावेश होता. उर्वरित कुटुंबे ही नाशिक शहर, तालुक्‍यातील आहेत. पूर ओसरल्याने विस्थापित कुटुंबे घराकडे परतली. विस्थापित कुटुंबांना प्रत्येक 10 किलो तांदूळ व गव्हाचे वाटप करण्यात आले. 

जिल्ह्याला 20 कोटी 
शासनाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 20 कोटींचा निधी प्रशासनाला दिला आहे. प्रशासनाकडून दोन दिवस घरांत पुराचे पाणी घुसलेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी त्यातील नऊ कोटी रुपये नाशिक, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर आणि दिंडोरी या तालुक्‍यांकडे वर्ग केला आहे. बाधित कुटुंबांच्या तालुकास्तरावर याद्या तयार करून धनादेश अथवा डीडीच्या माध्यमातून मदत दिली जात असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

आणखी आठवडा 
दरम्यान, जिल्ह्यातील महापुराने बाधित झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे कामकाज सुरू आहे. आणखी आठवडाभर तरी घरांची व मालमत्तांच्या पडझडीची माहिती घेण्याचे कामकाज सुरू राहील. ग्रामीण भागात अनेक शेतांत अजूनही पाणी असल्याने पंचनाम्यात अडचणी येत असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news FLOOD PROBLEM