मूर्तीदानाला सामाजिक संस्थांचे हात, लाखांच्या आसपास दान

live
live

नाशिक : अनंत चतुर्दशीनिमित्त काल (ता.23) शहरातील विविध विसर्जनस्थळी शैक्षणिक, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक उपस्थित होते. महापालिकेच्या मूर्ती दान उपक्रमाला विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांनी हातभार लावत योगदान दिले. उत्सव काळातील निर्माल्य नदी पात्रात न टाकता, कलशात टाकण्याचा आग्रह यावेळी स्वयंसेवकांनी धरल्याने मोठ्या प्रमाणावर निर्माल्य संकलन झाले आहे. जवळपास 1 लाख 16 हजारांच्या आसपास मुर्ती दान करण्यात आल्या तर 107 टन निर्माल्य जमा झाले. 

शहरातील रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण परीसरात तसेच चोपडा लॉन्स परीसर, तपोवन येथेही सामाजिक संस्थांकडून मूर्ती संकलनाचे काम सुरू होते. सकाळी नऊपासून सायंकाळी उशीरापर्यंत विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना स्वयंसेवक मूर्ती दान करण्याचे आवाहन करीत होते. तसेच त्यांच्याकडील निर्माल्य कलशात टाकत होते. 

"यिन', ठाकरे महाविद्यालयातर्फे रामकुंड, सोमेश्वरला उपक्रम 
"सकाळ'चे "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे ऍड.बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संकल्प संस्था यांच्यातर्फे गोदाकाठावरील रामकुंड परीसर व सोमेश्वर परीसरात मूर्ती संकलीत करण्यात आल्या. उपक्रमाचे संयोजन संतोष मुंढे, गिरीष पवार, विशाल राजोळे यांनी केले. तर उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. होळकर, प्रा. आर. एस. कारे, प्रा.डॉ.सोपान तळेकर, प्रा. प्रसाद जोशी, "यिन'चे समन्वयक गणेश जगदाळे, लोकेश चव्हाण यांचे सहकार्य लाभले. पोलिस आयुक्‍त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी स्वयंसेवकांची भेट घेत, त्यांचा उत्साह वाढवला. तर "यिन' व ठाकरे महाविद्यालयातर्फे राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक सातपुर येथील विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी केले. या उपक्रमातून महापालिकेला मूर्ती संकलनासाठी सहाय्य लाभल्याचे त्यांनी नमुद केले. उपक्रमात शुभम कस्तुरे, प्रसाद शिरोडे, आकाश राठोड, शिवानी शाह, प्रांजल केदार, सौरभ गिते, सागर पाटील, वेदांत भामरे, विशाल राजोळे आदींनी सहभाग नोंदविला. 


विद्यार्थी कृती समितीतर्फे "देव द्या, देवपण घ्या' 
चोपडा लॉन्सजवळील गोदापार्क परीसरात विद्यार्थी कृती समितीतर्फे "देव द्या, देवपण घ्या' उपक्रम राबविला. याअंतर्गत 11 हजार 258 भाविकांनी गणेशमूर्ती दान केल्याची माहिती अध्यक्ष आकाश पगार यांनी दिली. संघटनेतर्फे गेल्या आठ वर्षांपासून उपक्रम राबविला जातोय. गणेशोत्सव कालावधीत मंडळे व घरोघरी जाऊन विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करणारे पत्रके वाटप केलेत. तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून आवाहन केले. सुमारे तीनशे कार्यकर्त्यांनी उपक्रमात सहभाग नोंदविला. यात विशाल गांगुर्डे, जयंत सोनवणे, रोहित कळमकर, सागर बाविस्कर, संकेत वानखेडे, राहुल मकवाना, प्रशांत 
खंडाळकर, तुषार गायकवाड, कोमल कुरकुरे, मयूर पवार, अभिजित पाटील, योगेश माळोदे, किशोर वाघ, वैष्णवी 
जोशी, रसिका सावंत, दीपाली जाधव, स्नेहा पवार, स्नेहा आहेर, नुपूर भुजबळ, भक्ती शहाणे, अपूर्वा सोनवणे, प्रतीक्षा वाखारे, मोनाली गवे, स्नेहल उफाडे आदींनी परीश्रम घेतले. 


"संवर्धन'तर्फे भाविकांना  पंधराशे रोपट्यांचे वाटप 
संवर्धन संस्थेने "एक मूर्ती, एक झाड" उपक्रम राबविला. मूर्ती दान करणाऱ्या भाविकांना बाप्पांची आठवण म्हणून रोप भेट देण्यात आले. गेल्या 9 वर्षांपासून संवर्धनतर्फे मूर्तीदानाचा उपक्रम राबविला जात आहे. या वर्षी 2 हजार 278 मूर्ती संकलन करून पंधराशे रोपट्यांचे वाटप केले. घारपुरे घाट परीसरात राबविलेल्या उपक्रमात तुळस, गवती चहा, कढीपत्ता आणि मोगरा आदी झाडे वाटप केली. या ठिकाणी क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रयास सामाजिक संस्थेच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य संवर्धनला मिळाले. उपक्रमामध्ये संकलीत निर्माल्य रचना विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांच्या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाकडे दिला. उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य विशाखा जाखडी, आनंद देशपांडे, प्रतीक थोरात, रवी खैरे, निखिल केदार, समर्थ बाफना यांचे लाभले. तसेच उपक्रमाचे आयोजन स्नेहा वासवानी, मुक्ता कावळे, रवी वासवानी, हर्ष बेलदार, आदित्य लोखंडे, मानस भट, चेतन नारखेडे आदींनी सहभाग नोंदविला. 

"अभाविप'तर्फे सलग बाराव्या वर्षी उपक्रम 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक महानगरातर्फे रामकुंड परीसरात गणेशमुर्ती व निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविला. अभाविपने सुरू केलेल्या या उपक्रमास यावर्षी 12 वर्षे पुर्ण झाले. कार्यकर्त्यांनी रामकुंडावर भाविकांशी संवाद साधत त्यांना गणेशमुर्ती दान करण्याचे आवाहन केले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांनी उपक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. "अभाविपने सुरू केलेल्या उपक्रमात वाढता प्रतिसाद स्वागतार्ह असल्याचे मत महानगर मंत्री प्रथमेश नाईक यांनी व्यक्‍त केले. उपक्रमात जिल्हा संयोजक सागर शेलार, वैभव गुंजाळ, नितीन पाटील, राकेश साळुंके, अथर्व कुलकर्णी, तेजल चौधरी, सुयश सोनी, आदित्य आढाव, सिद्धेश्वर भदाने, विशाल रासकर, विकास थेटे, तेजस जाधव, योगेश्वरी सोनवणे, वैष्णवी गुंजाळ, भक्ती दोडे, श्रध्दा लवांगे, पुजा ढापसे आदींनी सहभाग नोंदविला. 


ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य संकलन 
ऊर्जा युवा प्रतिष्ठान व युवा सेना यांच्यातर्फे चोपडा लॉन्स परीसरात आलेल्या भाविकांकडून निर्माल्य संकलन करण्यात आले. तसेच भाविकांना भेट स्वरूपात पर्यावरणपूरक पिशव्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. मूर्ती दान करून नदी प्रदूषणाला आळा घालण्याचेही आवाहन पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावेळी केले. 2007 पासून प्रतिष्इानतर्फे निर्माल्य संकलनाचे काम केले जात आहे. या उपक्रमाला विविध सामाजिक संस्थांनीही पाठबळ देत, सहभाग नोंदविला आहे. महापालिकेचे विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे महानगरप्रमुख आदित्य बोरस्ते, जेसीआय ग्रुपचे प्रफुल्ल पारख, लायन्स इंटरनॅशनल ग्रुपचे हंसराज देशमुख, हर्षल पाटील, रोशन क्षीरसागर, अविनाश चव्हाण, अक्षय कातोड, परेश इसराणी आदींचा सहभाग होता. 

नेचर क्‍लब ऑफ नाशिक तर्फे निर्माल्यातून फुलाकडे उपक्रम 
नेचर क्‍लब ऑफ नाशिकतर्फे गंगापूर येथील बालाजी मंदिरा जवळील धबधब्याजवळ "निर्माल्यातून फुलाकडे' उपक्रम राबविला. बावीसव्या वर्षी हा उपक्रम राबविला. यावर्षी दीड टन निर्माल्य संकलन केले. व चार हजार नागरिकांना निर्माल्यातून खत तयार करण्याचे प्रात्यक्षिकेदेखील दाखविण्यात आले. संस्थेने दोन हजार मुर्त्या संकलीत केल्या. उपक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा.आनंद बोरा, पक्षिमित्र चंद्रकांत दुसाने, प्रमिला पाटील, सागर बनकर,दर्शन घुगे,सलोनी वाघमारे, आशिष बनकर, आकाश जाधव, महेश थोरात, समीर ठाकूर,अमोल उबाळे, क्रिशी बोरा, धनंजय बागड आदींनी सहभाग नोंदविला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com