कचरा ठरतोय उत्पन्नाचा स्त्रोत 

सुधाकर पाटील
गुरुवार, 11 जानेवारी 2018

भडगाव - जो कचरा ऐरवी असाच पडून रहायचा तो कचरा दररोज संकलित करुन त्यातून भडगाव पालिकेने उत्पन्न मिळवायला सुरवात केली आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करुन पुठ्ठा, काच, भंगार, रद्दी, प्लास्टिकच्या कचऱ्यातून एका महीन्यात 16 हजाराचे उत्पन्न मिळाले. 

भारत स्वच्छ अभियानांतर्गत पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे शहर स्वच्छ दिसायला लागले आहेत. दररोज घंटागाडीच्या माध्यमाने कचरा संकलित केला जातो. कचरा गोळा करतानांच सुका व ओला कचरा वेगवेगळा टाकला जातो. पालिका प्रशासनाने या कचऱ्याचे वर्गीकरण करुन सुका कचऱ्यातूनही उत्पन्न सुरु केल्याचे चित्र आहे. 

16 हजारांचे एका महीन्यात उत्पन्न
पालिका प्रशासनाने घंटागाडीवरच कचरा टाकण्यासाठी वेगवेगळे डबे ठेवले आहेत. नागरिकांनी कचरा दिल्यानंतर त्यापद्धतीने कचरा त्यात्या डब्यात टाकला जातो. त्यानंतर ओला कचरा डंपीग ग्राउंड तर सुका कचऱ्याची विगतवारी करून तो वेगवेगळा ठेवण्यात येतो. गेल्या महीन्यात पालिकेने कचरा संकलनातून आलेल्या पुठ्ठा, प्लास्टीक, गोणपाट, काच, पत्रा, रद्दी यातून 15 हजार 850 रुपयाचे उत्पन्न मिळविले. या महीन्यात ते उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. 

कंपोस्ट खताचाही प्रकल्प
सुक्या कचऱ्यातून उत्पन्न सुरु केल्यानंतर पालिकेने ओल्या कचऱ्यातून उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला आहे. शहरात टोणगाव, यशवंतनगर, बीएसएनल कार्यालयाजवळ, पेठ भागात अशा चार ठिकाणी कंपोस्ट खताचा प्रकल्प सुरु केला आहे. या ठिकाणी कुजणारा ओला कचरा टाकला जातो. त्यात प्रक्रियेसाठी जिवाणु सोडण्यात आले आहेत. यातून पालिकेला उत्पन्न मिळणार आहे. विशेष म्हणजे हे कंपोस्ट खताचे प्रकल्प हे बचत गट व अपंगाना चालवायला दिले आहेत. महिला व अपंगाना रोजगार मिळणार आहे.

दररोज 10 टन कचऱ्याचे संकलन 
भडगाव शहरातून दररोज तब्बल दहा टन कचरा संकलित केला जाता आहे. यापुर्वी हा कचरा असाच चौकाचौकात पडून राहायचा. पालिका प्रशासनाने कचरा तर संकलित केलाच आहे. पण त्याबरोबर त्यातून पालिकेला सुका कचऱ्याच्या विक्रीतून व कंपोस्ट खत निर्मितीतून उत्पन्नाचा नविन मार्ग सुरू केला आहे. त्यामुळे पालिकेने स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल सुरु केल्याचे हे द्योतक आहे. 

घंटागाडीतच ओला व सुका करण्यासाठी वेगवेगळ्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार कचरा त्या त्या डब्यात टाकला जातो. पहिल्या महीन्यात सुका कचऱ्याच्या विक्रीतून 15 हजार 850 रुपयाचे उत्पन्न पालिकेला मिळाले आहे, असे मत भडगाव येथील मुख्याधिकारी राहूल पाटील यांनी व्यक्त केले. तर पालिकेने कचऱ्यातून उत्पन्न सुरु केले आहे. याशिवाय कंपोस्ट खत निर्मितीचे काम महिला बचत गट व अपंगांना दिल्याने त्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेऊन तो घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन भडगाव येथील नगरध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले.  

Web Title: marathi news garbage earn money