कचरा विलगिकरण न करणाऱ्यांवर महापालिकेचे बहिष्कारास्त्र 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

नाशिक : आतापर्यंत घरातून घनकचरा संकलित केला जात होता.पण नागरिकांना आता ओला, सुका व ई-कचरा असे तीन भागात विलगिकरण करून कचरा द्यावा लागणार आहे. एक एप्रिल पासून त्याची कडक अंमलबजावणी करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी काढला आहे. विलगिकरण न करता कचरा न देणाऱ्या घरगुती ग्राहकांना पाचशे तर व्यावसायिकांकडून दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. त्यानंतरही कचरा विलगिकरण न झाल्यास पंधरा एप्रिल पासून अशा लोकांचा कचराचं घ्यायचा नाही असा पवित्रा महापालिकेने घेतला आहे.रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाईला अशा लोकांना सामोरे जावे लागणार आहे. 

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. अभियानांतर्गत महापालिकेने ओला, सुका व ई-कचरा या तीन प्रकारात कचऱ्याचे विलगिकरण करून घंटागाड्यांमध्ये टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. एक वर्षांपासून सुरु असलेल्या जनजागृती मोहिमेनंतरही अवघे वीस टक्के विलगिकरण केलेला कचरा प्राप्त होत असल्याने पालिकेच्या जनजागृती मोहिमेला अपयश आले आहे. त्यात राज्य शासनाने विलगिकरण केलेला कचरा न मिळाल्यास महापालिकेचे अनुदान बंद करण्याच्या ईशारा दिल्याने पालिकेने कचरा विलगिकरणावर लक्ष केंद्रीत केले आहे. येत्या एक एप्रिल पासून घरातूनचं कचरा विलगिकरण करून घंटागाडी कामगारांना द्यावा लागणार आहे. 
 
कचरा जाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई 
कचरा जाळल्यानंतर प्रदुषणात वाढ होणे, दुर्गंधी पसरणे तसेच अस्वच्छतेमुळे रोगाला निमंत्रण मिळतं असल्याने त्यापार्श्‍वभूमीवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पालापाचोळा, प्लास्टिक, रबर जाळताना आढळल्यास पाच हजार रुपये, सर्व प्रकारचा मोठ्या प्रमाणात कचरा जाळताना आढळल्यास 25 हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दहा हजार रुपये, रस्त्यावर घाण केल्यास 180 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दिडेश रुपये, उघड्यावर लघुशंका केल्यास दोनशे तर, शौच करणाऱ्यांना 500 रुपये दंड द्यावा लागणार आहे. 

असे असेल कचरा विलगिकरण 
ओला कचरा- भाजीपाला, चहा पावडर, अंडी, फळांचे साल आदी स्वयंपाक घरात निर्माण होणारा घनकचरा. 
सुका कचरा- वृत्तपत्रे, कागद, पुष्ठा, दुधाची पिशवी आदी प्रकारचा पुर्नवापर करता येणारा कचरा. 
ई-कचरा- सीएफएल बल्ब, ट्युबलाईट, मुदतबाह्य औषधे, तुटलेली थर्मामीटर, घरगुती वापर झालेल्या बॅटरी, कापूस बोळे, घरगुती वापरलेल्या सुया, नष्ट केलेले रंगाचे डबे, किटकनाशक डबे. 

Web Title: marathi news garbage problem