आमदार निर्मला गावीत यांचा शिवसेना पक्षप्रवेश उद्यापर्यंत लांबणीवर

ज्ञानेश्वर गुळवे
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

अस्वली स्टेशन:  इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघाच्या आमदार निर्मला गावीत यांनी  आज काँगेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. आ.गावीत यांचा आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी चार वाजता शिवसेनेत अधिकृत प्रवेश सोहळा होता,मात्र माहिमचे आमदार सदा सरवणकर यांच्या पत्नी राजनंदा सरवणकर यांचे दुःखद निधन झाल्यामुळे सर्व कार्यक्रम स्थगित झाले.

हा सोहळा उद्या सकाळी अकरावाजता होईल. असे दस्तुरखुद्द आमदार निर्मला गावीत यांनी पडघा टोलनाक्याजवळील सिद्ध हॉटेलवर जमलेल्या कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी तालुक्यातील शेकडो प्रमुख पदाधिकारी व मोठ्या प्रमाणावर समर्थकांनी गर्दी केली होती.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news gavit in ss