नाशिकमध्ये गोदावरी दुथडी भरून,जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

महेंद्र महाजन
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नाशिक : संततधार पाऊस कोसळत असून गोदावरी दुथडी भरून वाहतेय. दुतोंडी मारुतीच्या छातीच्या वर गोदावरी चे पाणी आहे. कसारा घाट एका बाजूने वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे.

नाशिक : संततधार पाऊस कोसळत असून गोदावरी दुथडी भरून वाहतेय. दुतोंडी मारुतीच्या छातीच्या वर गोदावरी चे पाणी आहे. कसारा घाट एका बाजूने वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे.

धरणातून सोडण्यात येत असलेला विसर्ग कायम आहे. गंगापूर धरणातून 5170, दारणा मधून 9554 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. जायकवाडी साठी नांदूरमध्यमेश्वर मधून 32 हजार 858 क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. आज सकाळी 8 ला संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलिमीटर मध्ये असा : नाशिक 9.1, इगतपुरी-61, त्रम्बकेश्वर-68, दिंडोरी-15, पेठ-45, सुरगाणा-45. अतिवृष्टीचा हवामान विभागाकडून अद्याप इशारा देण्यात आलेला नाही. यापूर्वीच्या इशाऱ्यानुसार आज प्रशासनतर्फे आपत्ती व्यवस्थापन ची आवश्यकता भासल्यास उपाययोजना करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news godhvari river