निवडणुक प्रचारातून "खासदार' गायब? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

नाशिक- लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार असलेले हेमंत गोडसे खासदार झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारात त्यांनी अंग झोकून काम करणे अपेक्षित असताना अद्यापही ते सक्रीय न झाल्याने खासदार गोडसे गेले कुठे? असे म्हणण्याची वेळ शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांवर आली आहे. 

नाशिक- लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार असलेले हेमंत गोडसे खासदार झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारात त्यांनी अंग झोकून काम करणे अपेक्षित असताना अद्यापही ते सक्रीय न झाल्याने खासदार गोडसे गेले कुठे? असे म्हणण्याची वेळ शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांवर आली आहे. 

नाशिक लोकसभा मतदारसंघात सलग दोनदा खासदार निवडून येत नसल्याची परंपरा यंदा हेमंत गोडसे यांच्या निवडीनंतर मोडीत निघाली आहे. त्यामागे भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांचे अथक प्रयत्न कारणीभुत ठरले. खासदार गोडसे यांच्या उमेदवारी शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांचा विरोध होता. भाजप मध्ये देखील गोडसे यांना उमेदवारी देण्यावरून मतभेद होते. परंतू पुन्हा एकदा "272' पेक्षा अधिक खासदार निवडून आणून महायुतीचे सरकार दिल्लीत स्थापन करण्याचा पण करण्यात आला होता. त्यामुळे क्षमता असो वा नसो पक्ष देईल त्या उमेदवारासाठी अंग झोकून काम करण्याची तयारी भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची होती. खासदार गोडसे या बाबतीत नशीबवान ठरले. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी

शिवसेनेबरोबरचं भाजपचे कार्यकर्ते उतरले त्यामुळे विक्रमी मतांनी त्यांनी विजय मिळविला. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने खासदार गोडसे यांच्या कडून परतफेड होणे अपेक्षित असताना प्रचार प्रक्रीयेतून ते गायब झाले आहेत. पश्‍चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यासाठी नगरसेवक आग्रही असताना गोडसे यांनी दुरून डोंगरे साजरे हि भुमिका घेतली. खासदार झाल्यापासून पक्षाचे कार्यक्रम तर सोडाचं कार्यालयात देखील ते पोहोचले नाही. जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या नऊ मतदारसंघात उमेदवारांची निश्‍चिती करताना त्यांना विचारातं घेतले नसले तरी प्रचारात सहभागी होणे अपेक्षित होते. ज्यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी महत्वाची भुमिका बजावली त्यांच्यासाठी तरी खासदारांनी मैदानात उतरायला हवे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news godse not in process