मेट्रो निओच्या रूपाने आणखी एक सार्वजनिक वाहतूक सुविधा,पालकमंत्र्याचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

नाशिकः नाशिकमध्ये जागतिक दर्जाची आणि पहिली टायरबेस एलिव्हेटेड मेट्रो निओ उभारली जात आहे. काल मंत्रीमंडळाने या प्रकल्पांला मान्यता दिल्याने नाशिककरांचे यानिमित्ताने स्वप्न साकार होणार आहे. या सर्व कामासाठी पालकमंत्री गिरीष महाजन यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला,याबद्दल भाजपतर्फे त्याचे काल मुंबईत स्वागत करण्यात आले.

स्थायी समितीचे सभापती उध्दव निमसे, सतिश सोनवणे, नाशिकरोड देवळाली व्यापारी बॅकेचे संचालक सुनिल आडके, भाजपचे नाशिकरोडचे कार्यकर्ते राजेश आढाव, सुनिल केदार, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे आदी उपस्थित होते. वेगाने विकसित होणाऱ्या नाशिकमध्ये विविध सुविधा उपलब्ध होऊ लागल्या आहेत. ओझरला विविध कंपन्यांतर्फे देशांतर्गत विमान सुविधा,महापालिकेतर्फे बससुविधांच्या जोडीला मेट्रोनिओद्वारे आणखी एक सुविधा उपलब्ध होत आहे. दूरदृष्टीकोन ठेवून विकसित होणाऱ्या या प्रकल्पामुळे नाशिकच्या विकासाला आणखी गती प्राप्त होण्यास मदत होईल,असे पालकमंत्र्यानी सांगितले. यावेळी पदाधिकार्यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news gurdian minister