निफाडमध्ये राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

halla-bolo-niphad
halla-bolo-niphad

निफाड : गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-शिवसेना युती सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरत असल्याने निफाड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने मा. आ. दिलीपराव बनकर यांच्या नेतृत्वाखाली निफाड तहसिल कार्यालावर हल्लाबोल आंदोलन केले.

 नोटबंदी, बाजार समिती नियमन मुक्ती, जी.एस.टी. यासारख्या गोष्टींमुळे शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेच्या समस्या, वाढती महागाई यामुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, लहान व्यावसायिक, शिक्षक, डॉक्टर्स या सर्वच क्षेत्रांमध्ये युती शासनाबद्दल तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. 

नोटबंदी सारख्या निर्णयामुळे देशाची व राज्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहे. शासनाने जाहीर केलेली कृषि कर्जमाफी अद्यापपर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहचली नाही. त्यामध्ये शासनाने अनेक त्रुटी निर्माण करून चाल-ढकल करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांना नवीन पिकांसाठी बँकामार्फत कर्ज उपलब्ध होत नाही. सदयस्थितीत असलेल्या पिकांना भाव नाही. याकरिता सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा उतारा कोरा करावा. 

शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर आयात केल्याने व देशातील शेतीमाल जास्तीत जास्त प्रमाणात निर्यात होत नसल्याने शासनाच्या या चुकीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे गेल्या तीन वर्षात एकाही पिकाला हमी भावाएवढा बाजारभाव मिळू शकला नाही. कांद्याच्या भावावर नियंत्रण ठेवण्याकरीता निर्यात मूल्य तात्काळ रद्द करण्यात यावे. उलट शासन फसव्या जाहिरातीवर करोडो रूपये खर्च करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे.

निफाड तालुक्यातील प्रमुख रस्ते, गावजोड रस्ते यांची अत्यंत दुरावस्था झालेली असून खड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा हेच समजत नाही. यामुळे अनेक अपघात होऊन शेतीमालाची नुकसान होत आहे. 

निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हिंसक प्राण्यांची वर्दळ वाढलेली असून अनेक शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी त्यांचे भक्ष्य ठरत आहे. तर शेतमजूर, शेतकरी यांच्यावर हल्ले वाढत आहेत. त्याबाबत शासनाच्या वन विभागाने तात्काळ कार्यवाही करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना दिवसा शेतीचे कामे करता यावी याकरीता दिवसा शेतीसाठी अखंडित व सुरळीत वीज पुरवठा करा. सक्तीची कृषी पंपांची वीजबिल वसुली तात्काळ बंद करून शेतकऱ्यांकडे शेतीमाल विक्रीनंतर येणाऱ्या पैशातून त्या त्या हंगामानुसार वीजबिलाची वसुली करण्यात यावी. 

उत्पादन खर्चावर आधारीत हमीभावाचे धोरण जाहीर करावे, शेतीव्यवसायाला मदत करावी आदी मागण्यांसाठी निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या भाजप शिवसेना युती सरकारच्या या अनागोंदी आणि सर्वसामान्य जनतेच्या विरोधी कारभाराच्या निषेधार्थ निफाड तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून मा. नायब तहसिलदार संघमित्रा बाविस्कर यांना निवेदन देऊन आंदोलनकर्त्या शेतकरी, कामगार, शेतमजूर, व्यापारी यांच्या भावना शासनाकडे पोहचविण्याकरिता विनंती करण्यात आली.   

याप्रसंगी निफाड तालुक्याचे माजी आमदार दिलीपराव बनकर, निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अनिल कुंदे, युवकांचे तालुकाध्यक्ष शिरीष गडाख, महिला अध्यक्षा सौ.अश्विनी मोगल, जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, सुरेश कमानकर, पिंपळगाव बाजार समितीचे उपसभापती निवृत्ती धनवटे, निफाड पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष कराड, सुरेश खोडे, राजेंद्र सांगळे, बाळासाहेब बनकर, विक्रम रंधवे, देवदत्त कापसे, राजेंद्र बोरगुडे, अंबादास आहेर, राजेंद्र खोडे, दिनकर मत्सागर, राजेंद्र कुटे, भूषण धनवटे, शिवाजी खरात, राजेंद्र निरगुडे, दत्तोपंत आथरे, संतोष आहेर, संपतराव व्यवहारे, समाधान कुंभार्डे, आरिफ मनियार, साईनाथ शिंदे, दिपक गाजरे, सोपान खालकर, रमेश शिंदे, दत्तात्रय चव्हाण, विष्णुपंत पानगव्हाणे, वकील शेख, रामराव मोगल, मंगेश महाले, शिवा बस्ते, संजय देवकर, मनोज पानगव्हाणे, ज्ञानेश्वर पानगव्हाणे, रावसाहेब गोळे, सौ.सुरेखा कुशारे, सचिन दरेकर, मनोज धारराव, अभिषेक हरळे, सोहेल मोमीन, पृथ्वीराज रणखांबे, सुदेश दरेकर, केशव गाडे, नवनाथ पवार, रफिक शेख, दत्तू भवर, अक्षय आहेर, अतुल टर्ले, इस्माईलभाई मोमीन, राजाभाऊ कानडे, विनायक कातकाडे, राजेंद्र निचित, धनंजय कुदे, ईश्वर धारराव, योगेश शिंदे, तुषार काळे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.     
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com