रुग्णांना आरोग्यसेवा पुरविण्यात "सिव्हिल' अव्वल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

नाशिक : राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्याच्या सोयीसुविधा व उपचारांमध्ये सर्वोत्तम कामगिरी नाशिक जिल्हा रुग्णालयाने केल्याचा निष्कर्ष राज्याच्या त्रिसदस्यीय "एन्कॉस' समितीने (नॅशनल क्वालिटी ऍशोरन्स कमिटी) नोंदविला आहे. 

नाशिक : राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्याच्या सोयीसुविधा व उपचारांमध्ये सर्वोत्तम कामगिरी नाशिक जिल्हा रुग्णालयाने केल्याचा निष्कर्ष राज्याच्या त्रिसदस्यीय "एन्कॉस' समितीने (नॅशनल क्वालिटी ऍशोरन्स कमिटी) नोंदविला आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून राज्यस्तरीय "एन्कॉस' समितीकडून जिल्हा रुग्णालयाच्या विभागांना भेटी देत पाहणी व दप्तर तपासणी करण्यात आली. त्यानुसार, जिल्हा रुग्णालयास तब्बल 83 टक्के गुण प्राप्त झाल्याचा अहवाल समितीने केंद्र शासनाच्या आरोग्य विभागास सादर केला जाणार आहे. या अहवालानुसार केंद्रस्तरीय समितीतर्फेही जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली जाण्याची शक्‍यता आहे. त्याही परीक्षेत जिल्हा रुग्णालयाने बाजी मारल्यास खाटांच्या संख्येनुसार केंद्रांकडून भरघोस निधी मिळेल. 

गेल्या तीन दिवसांपासून डॉ. प्रशांत भंडारे, डॉ. उमेश बागडे, डॉ. राहुल शिंदे या राज्यस्तरीय "एन्कॉस' समितीकडून जिल्हा रुग्णालयातील 18 विभागांची पाहणी केली. यात जिल्हा रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यापासून त्यास देण्यात आलेल्या सोयीसुविधा, करण्यात आलेले उपचार, त्यासाठीच्या शासकीय योजनांचा रुग्णांना देण्यात आलेला लाभ यासह विविध आरोग्यविषयक बाबींची बारकाईने पाहणी केली. त्यानुसार गुण दिले. या अहवालाची खातरजमा वा रुग्णांना सर्वोच्च सेवा देणाऱ्या नाशिक जिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी केंद्राचीही समिती येण्याची शक्‍यता आहे. राज्यस्तरीय नॅक समितीसमोर जिल्हा रुग्णालयातील सेवांच्या माहितीचे डॉ. निखिल सैंदाणे यांनी सादरीकरण केले. 

खाटांनुसार मिळणार निधी 
राज्य "एन्कॉस' समितीच्या अहवालाची खातरजमा करण्यासाठी केंद्रीय आरोग्य समितीही जिल्हा रुग्णालयाची पाहणी करू शकते. जर केंद्राच्या समितीच्या परीक्षेमध्ये जिल्हा रुग्णालय "पास' झाले तर रुग्णालयांतील खाटांच्या संख्येनुसार जिल्हा रुग्णालयास निधी उपलब्ध होऊ शकतो. 

नाशिककरांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. राज्यभरातील 35 जिल्हा रुग्णालयांमध्ये नाशिक जिल्हा रुग्णालयाने अव्वल येण्याचा मान मिळविणे सोपे नाही; परंतु वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचाच हा परिणाम आहे. कायाकल्पपेक्षाही अत्यंत काठिन्य पातळीवरील ही प्रक्रिया होती. त्यात अव्वल असणे साधारण बाब नाही परंतु सांघिक कामगिरीमुळे हे होऊ शकले. 
-डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक 
 

Web Title: Marathi news health related issue