आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय  शैक्षणिक केंद्राचे मंगळवारी मुंबईत उद्‌घाटन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्राचे उद्‌घाटन येत्या मंगळवारी (ता. 7) सायंकाळी पाचला मुंबईत सह्याद्री अतिथिगृह येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन खात्याचे मंत्री पॉल पॅपेलिया, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाचे सचिव संजय देशमुख, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर उपस्थित राहतील. या वेळी प्राथमिक सामंजस्य करार आदानप्रदान करण्याबरोबरच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत करार केले जातील. 

या संदर्भात कुलगुरू डॉ. म्हैसेकर म्हणाले, की विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्राद्वारे विद्यापीठाची शिक्षणप्रणाली जागतिक पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, ट्रस्टसमवेत परस्पर प्राथमिक सामंजस्य करार करण्यात येत आहेत. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले, की उद्‌घाटन समारंभाप्रसंगी निवडक 38 संस्थांसमवेत करार केले जाणार आहेत. यात हेल्थ करिअर्स इंटरनॅशनल (मलेशिया), हेल्थ करिअर्स इंटरनॅशनल (फिलिपीन्स), हेल्थ करिअर्स इंटरनॅशनल (दुबई), ग्लोबल एज्युकेशन ऍन्ड एम्पॉनमेंट कन्सोर्शियम (ऑस्ट्रेलिया), इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ऍन्ड मॅनेजमेंट (ऑस्ट्रेलिया), एडिनबर्ग युनिव्हर्सिटी (यूके), नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ नॅचरल मेडिसीन (अमेरिका) आदींचा समावेश आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (नवी दिल्ली) व देशातील अन्य संस्था, विविध बॅंकांशी प्राथमिक सामंजस्य कराराचे आदानप्रदान केले जाणार आहे. 
 
Web Title: marathi news health university