गुंडाळलेले आंदोलन नव्या जोमात,  आंदोलकांची तिसरी तुकडी उपोषणाला रस्त्यावर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

नाशिकः न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर प्रशासनाने दडपशाहीने उठविलेल्या आंदोलकांना त्यांचा तंबू परत केला. त्यानंतर आरोग्य विज्ञान विद्यापिठातील कंत्राटी 
कामगारांचे आंदोलन पून्हा नव्या जोमाने सुरु झाले. 

नाशिकः न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर प्रशासनाने दडपशाहीने उठविलेल्या आंदोलकांना त्यांचा तंबू परत केला. त्यानंतर आरोग्य विज्ञान विद्यापिठातील कंत्राटी 
कामगारांचे आंदोलन पून्हा नव्या जोमाने सुरु झाले. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठातील 307 कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी सहा महिण्यापासून आंदोलन चालविले आहे. विद्यापिठाकडून दखल घेतली जात नाही  यासाठी 1 मे महाराष्ट्रदिनापासून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले. त्यात, सात कर्मचारी अत्यावस्थ झाल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी व पोलिस यंत्रणांनी पोलिस बळाचा उपयोग करीत, आंदोलकांचा तंबू गुंडाळला. आंदोलकांना कलम 149 नुसार नोटीस बजावित सगळे आंदोलन मोडून काढले.

मंडप काढायला लावून आंदोलन गुंडाळण्याच्या या दडपशाही विरोधात आंदोलकांनी न्यायालयात धाव घेत दाद मागितली. हक्कांसाठीच्या आंदोलनात कलम 149 ची नोटीस कशी ? अशी विचारणा करत, न्यायालयाने दडपशाहीची दखल घेत पोलिसांकडे विचारणा केली. 
न्यायालयाच्या फटकारानंतर पोलिस व जिल्हाधिकारी यंत्रणा सजग झाली आहे. गुंडाळलेला मंडप आणि तंबूचे साहित्य आंदोलकांना परत करीत पोलिस यंत्रणेने नमते घेतले. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर आंदोलकांनी पून्हा नव्या जोमाने आंदोलन तीव्र केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या बेमुदत उपोषणासाठी आंदोलकांची तिसरी तुकडी आंदोलनात उतरवित आरोग्य विद्यापिठाचा अन्याय पोलिस प्रशासनाच्या दडपशाही विरोधातील एल्गार तीव्र केला. 

Web Title: marathi news health university worker andolan