चाळीस वर्षापासून गोरगावलेत होळी पेटलीच नाही

डॉ. राजेंद्र सोनवणे
शुक्रवार, 2 मार्च 2018

गोरगावले - होळीच्या दिवशी लाकडांची जमवा जमव करून होळी पेटवून तिचे पुजन केले जाते. ही परंपरा म्हणून होळी उत्साहात साजरा केला जातो. परंतु, याला फाटा फोडत पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी गोरगावले येथील ग्रामस्थांनी समाजापुढे एक अनोखा आदर्श ठेवला आहे. गावात गेल्या चाळीस वर्षापासून होळीच पेटविण्यात आली नाही. तर हल्ली केवळ केरकचरा जाळून स्वच्छतेबाबत जनजागृतीही केली जात आहे. 

रानारानात फिरून लाकडे जमा केली जातात. परंतु, आपला आनंद म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास होतो. झाडे तोडली जातात. परंतु, चोपडा तालुक्‍यातील गोरगावले या गावात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेजण गावातील केरकचरा गोळा करून तो जाळून होळी साजरी करण्याची प्रथा चाळीस वर्षापासून अबाधित ठेवत आहे. गावात चाळीस वर्षापूर्वी होळी साजरी केली जात होती. या पार्श्‍वभूमीवर काही ज्येष्ठांनी पुढाकार घेऊन होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, आता चाळीस वर्ष झाले तरी गावात होळीच पेटत नसून, केवळ कचरा जाळून गोरगावलेकर औपचारिक होळी साजरी करतात. पर्यावरणाचा समतोल राखून जनजागृतीसाठी गोरगावलेकर सतत प्रयत्नशील आहेत. याकरीता सरपंच सुनील चौधरी, उपसरपंच अरुण कोळी, विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष सदानंद पाटील, कृषीमंचचे राजेंद्र पाटील, प्रल्हाद पाटील, प्रकाश पाटील, चोसाकाचे संचालक अनिल पाटील, ऍड. विनोद पाटील आदी यासाठी प्रयत्नशील आहेत.

Web Title: marathi news holi festival culture