केंद्रानेही डॉक्‍टरांच्या सुरक्षिततेबाबत कायदा करावा, आयएमएच्या बैठकीत सूर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

नाशिक : रुग्ण दगावल्यानंतर त्याचा ठपका उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांवर ठेवला जातो आणि जीवघेणा हल्ला करण्यात येऊन रुग्णालयाची तोडफोड केली जाते. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने शिक्षा व दंडाची तरतूद असलेला कायदा केला आहे. परंतु केंद्रशासनाकडून अद्यापही अशाप्रकारे कायदा नसल्याने डॉक्‍टरांवरील हल्लांना आळा बसू शकलेला नाही. त्यामुळे केंद्रानेही डॉक्‍टरांवरील हल्ल्यांना प्रतिबंध बसेल असा कायदा करावा, असा सूर आयएमएच्या नाशिक शाखेच्या बैठकीमध्ये डॉक्‍टरांनी लावला. 
 
कोलकत्ता येथील डॉक्‍टरांवरील हल्ल्याप्रकरणी आज देशव्यापी संपाची हाक आयएमएतर्फे देण्यात आली होती. त्यानुसार, खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी कक्ष (ओपीडी) आज बंद ठेवण्यात आली आहे. तर, अत्यावश्‍यक सुविधाच फक्त सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे यांच्या अध्यक्षतेखाली शालिमार चौकातील आयएमए सभागृहात यानिमित्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर डॉ. किरण शिंदे, डॉ. हेमंत सोननीस, सचिव डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. समीर चंद्रात्रे उपस्थित होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ima doctor meeting