नॅशनल मेडिकल बिलाविरोधात  आयएमएचा उद्या देशव्यापी बंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

नाशिक : केंद्र सरकारने मांडलेले आणि लोकसभेत संमत झालेले राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (नॅशनल मेडिकल बिल) विधेयकास इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेने विरोध केला आहे. आयएमएतर्फे विरोध नोंदविण्यासाठी देशव्यापी बंद पुकारला असून, नाशिक शाखा आंदोलनात सहभागी होत आहे. आंदोलनांतर्गत उद्या (ता.31) सकाळी सहापासून तर गुरूवारी (ता.1) सकाळी सहापर्यंत रूग्णालये बंद ठेवली जाणार असून, केवळ अत्यवस्थ रूग्णच तपासले जातील, अशी माहिती नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ.प्रशांत देवरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. 

देशभराप्रमाणे नाशिकमध्येही निदर्शने व उपोषण केले जाणार आहे. नव्या विधेयकानुसार भारतीय वैद्यक परीषदेचे प्रातिनिधिक अस्तित्व संपुष्टात येणार असून, नव्या आयोगात शासननियुक्त प्रतिनिधींची वर्णी लागणार आहे. केवळ पाच राज्यांना एकावेळी प्रतिनिधीत्व मिळेल. त्यामूळे इतर राज्ये, विद्यापीठे आणि वैद्यकीय व्यावसायिक यांना अजिबात थारा नाही. सध्या 134 सदस्य असलेल्या परीषदेचे कार्य 25 जण कसे सांभाळू शकतील, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news IMA STRIKE