नाशिकला जैन बांधवांचा अक्षयतृतीया महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मे 2019

नाशिक ः भगवान महावीरांच्या तत्त्वांना अनुसरून आत्मकल्याणासाठी धर्म प्रसार करणारे श्रमण संघाचे आचार्य ध्यानयोगी, युगप्रधान डॉ. शिवमुनी, युवाचार्य महेंद्रऋषीजी, प्रवर्तक प्रकाशमुनी यांच्यासह 60 ते 70 साधू- साध्वीच्या उपस्थितीत अक्षयतृतीया वर्षीतप पारणा महोत्सव पेठ रोड, तवली फाटा येथील सरस्वती विद्या केंद्रात होत आहे. 

नाशिक ः भगवान महावीरांच्या तत्त्वांना अनुसरून आत्मकल्याणासाठी धर्म प्रसार करणारे श्रमण संघाचे आचार्य ध्यानयोगी, युगप्रधान डॉ. शिवमुनी, युवाचार्य महेंद्रऋषीजी, प्रवर्तक प्रकाशमुनी यांच्यासह 60 ते 70 साधू- साध्वीच्या उपस्थितीत अक्षयतृतीया वर्षीतप पारणा महोत्सव पेठ रोड, तवली फाटा येथील सरस्वती विद्या केंद्रात होत आहे. 

त्यानिमित्ताने शुक्रवारी (ता. 3) त्र्यंबकेश्‍वर येथील चंद्रेश लॉन्स येथे महाराजांचे आगमन होईल. श्री ऑल इंडिया श्‍वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स दिल्ली व नाशिक जिल्हा सकल जैन श्रीसंघ यांच्यातर्फे सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत त्र्यंबकेश्‍वरला स्वागत सोहळा होईल. डॉ. शिवमुनी हे 25 वर्षांनंतर महाराष्ट्रात नाशिकमध्ये येत असल्याने जैन समाजात उत्साहाचे वातावरण आहे. ते जैन श्रमण संघाचे नेतृत्व गेल्या 15 वर्षांपासून करत असून, जैन दर्शनाचा सखोल अभ्यास व संशोधन करून डॉक्‍टरेट, डी. लिट. पदवी प्राप्त केली. भगवान महावीरांची ध्यानधारणा कशी होती, या विषयावर ध्यानसाधना करत आत्म ज्ञानसाधना पद्धतीचा त्यांनी शोध लावला. 
    शुक्रवारी (ता. 3) त्र्यंबकेश्‍वरला प्रवेश झाल्यानंतर शनिवारी (ता. 4) विल्होळी, रविवारी (ता. 5) रविवार कारंजा येथे व त्यानंतर सोमवारी (ता. 6) तवली फाटा, सरस्वती विद्या केंद्र येथे आगमन होईल. आतापर्यंत भारतात लुधियाना, दिल्ली, जम्मू, उदयपूर, इंदूर, सूरत, बेंगळुरू अशा अनेक ठिकाणी पायी यात्रा करत 47 ठिकाणी चातुर्मास केले. चातुर्मासात त्यांचे आत्म ध्यानसाधनाचे एकदिवसीय बेसिक शिबिरापासून चार, सात व दहा दिवसांचे शिबिर होते. पत्रकार परिषदेत जैन श्‍वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ नाशिकचे सचिव सुभाष लोढा यांनी माहिती दिली. यावेळी संघाचे अध्यक्ष राजमल भंडारी, सचिव पंकजकुमार शामसुका, सहसचिव विजयकुमार कोठारी, सहसचिव जयप्रकाश लुणावत, खजिनदार पारसमल साखला, संगिता सुराणा, हरिष खटोड, सागर भटेवरा, शांतीलाल हिरण, मोहनलाल लोढा, सुभाष भंडारी, निलेश भंडारी, आदी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jain mohatsav